नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतामध्ये पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पुरवणाऱ्या जाळ्याचा मोठा पर्दाफाश होत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ११ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे.
Related News
व्यापार करारादरम्यान ट्रम्प भडकले!
2025: अमेरिकेच्या जवळ जाताच Pakistanचे चीनवर प्रहार
माहिकाच्या हातातील अंगठीने उडाली चर्चा
टॉप 5 खास कारणे: Parineeti–Raghavयांनी मुलाचे ‘नीर’ हे शक्तिशाली नाव का निवडलं?
5 धक्कादायक कारणे: उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, अनगर नगरपंचायतीत खळबळ माजली
7 Powerful Reasons Behind Kiran Gaikwad Social Media Detox: देवमाणूस फेम अभिनेत्याने अचानक का सोडलं सोशल मीडिया? धक्कादायक खुलासा!
बाळापूरमध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा; असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अप)मध्ये प्रवेश
10 मिनिटांत Parineeti Chopraचा जुगाड मेकअप – तुम्हाला बनवेल ब्राइट आणि ब्यूटीफुल!
40 वर्षांनंतरही Aditya Roy Kapur कसा टिकवतो आपली फिटनेस? जाणून घ्या ७ प्रमुख टिप्स
तुमच्या किचनसाठी योग्य केटल (Kettle) : 6 कारणं ज्यामुळे तुम्ही चुकणार नाही
रोज दहीपाणी(Buttermilk )प्यायल्यास 5 अद्भुत फायदे – तुमचे आरोग्य झपाट्याने सुधारेल!
Priyanka Chopra ने अनामिका खन्ना डिझाईन केलेल्या 6 आश्चर्यकारक लूकसह फॅशनचा जादू दाखवली
यामध्ये हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील विविध भागांतून अटक केलेल्या संशयितांचा समावेश आहे.
नूंहमधून पुन्हा एक जासूस अटकेत
हरियाणातील नूंह जिल्ह्यातून पुन्हा एक पाकिस्तानी गुप्तहेर अटकेत आला आहे.
अटक केलेल्या व्यक्तीचं नाव मोहम्मद तारिफ असून तो कंगरका गावातील रहिवासी आहे.
यापूर्वी राजाका गावातील अरमान या तरुणाला देखील पाकिस्तानसाठी
गुप्त माहिती देत असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
सोशल मीडियावरून लष्करी माहिती पाकिस्तानला
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अरमानने दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगातील
अधिकाऱ्यासोबत संपर्क साधून भारतीय लष्करासंबंधी माहिती शेअर केली होती.
तो व्हॉट्सअॅप व सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पाठवत होता.
तपासात त्याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानशी संपर्क साधलेले फोटो, व्हिडिओ व चॅट्स सापडले आहेत.
आतापर्यंत अटकेत असलेले ११ जासूस
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशात अटक झालेल्या संशयित पाक गुप्तहेरांची यादी:
ज्योती मल्होत्रा – हरियाणा (युट्यूबर)
अरमान – नूंह, हरियाणा
मोहम्मद तारिफ – नूंह, हरियाणा
देवेंद्रसिंह ढिल्लों – कैथल, हरियाणा
मोहम्मद मुर्तजा अली – जालंधर, पंजाब
गजाला – पंजाब
यासीन मोहम्मद – पंजाब
सुखप्रीत सिंह – गुरदासपूर, पंजाब
करणबीर सिंह – गुरदासपूर, पंजाब
शहजाद – मुरादाबाद, उत्तर प्रदेश
नोमान इलाही – कैराना, उत्तर प्रदेश
🇮🇳 भारताकडून चौकशी आणि कारवाई वेगात
केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य पोलिसांकडून संयुक्त मोहिमेद्वारे देशात पाक गुप्तहेर जाळ्यावर कडक कारवाई सुरू आहे.
विशेषतः सोशल मीडियावरून चालणारी माहितीची देवाणघेवाण आणि परदेशी दूतावासांशी अनधिकृत संबंध यावर तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पुढील अटकांची शक्यता वर्तवली जात असून,
केंद्र सरकारकडून देशांतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला जात आह.
Read Also : https://ajinkyabharat.com/detective-jyoti-malhotra-episode-revealed/
