शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक

शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक

श्रीनगर | १३ मे २०२५

जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील शुकरू-केलर परिसरात आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि

अतिरेक्यांमध्ये भीषण चकमक झाली. या कारवाईत सुरक्षा दलांनी तीन पाकिस्तानी अतिरेकी ठार केले आहेत.

Related News

 बर्फ वितळताच पाकिस्तानातून घुसखोरी

पोलिस आणि लष्करी सूत्रांनुसार, या अतिरेक्यांनी पाकिस्तानातून बर्फ वितळण्याच्या हंगामाचा

फायदा घेत भारतात घुसखोरी केली होती. दक्षिण काश्मीरमध्ये शुकरू-केलर परिसरात तीन

ते चार अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केले.

 अतिरेक्यांकडून गोळीबार, चोख प्रत्युत्तर

अतिरेकींनी घेरले गेल्याचे लक्षात येताच गोळीबार सुरू केला. मात्र, सुरक्षा दलांनी अचूक प्रत्युत्तर

देत तीन अतिरेकी ठार केले. चकमकीनंतर परिसरात अजून

कोणी अतिरेकी लपले आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.

 परिसरात तणाव, इंटरनेट सेवा स्थगित

चकमकीनंतर शोपियां परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.

कोणतीही अफवा पसरू नये म्हणून प्रशासनाने इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली आहे.

🇮🇳 ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची कामगिरी

ही कारवाई ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर अधिक महत्त्वाची ठरते. अलीकडेच भारताने पाकिस्तानला

जोरदार प्रत्युत्तर दिलं असून, काश्मीरमध्ये अतिरेक्यांची हालचाल वाढू लागल्याचं सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/pakistancha-khotaradepana-ughad/

Related News