चूकूनही करू नका ही एक चूक

चूकूनही करू नका ही एक चूक

९ मे २०२५ | नवी दिल्ली

भारतातील अनेक कुटुंबांना सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेतून दरमहा कमी किमतीत किंवा मोफत रेशन मिळते.

‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम’ (NFSA) अंतर्गत देण्यात येणाऱ्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे.

Related News

मात्र, एका छोट्याशा चुकीमुळे तुमचं रेशन कार्ड कायमचं रद्द होऊ शकतं.

सरकारच्या नियमांनुसार, दीर्घकाळ वापरात न आलेले रेशन कार्ड ‘इनॲक्टिव्ह’ मानले जाते.

म्हणजेच, जर एखाद्या कुटुंबाने अनेक महिन्यांपासून आपल्या रेशन कार्डवर शिधा उचलला नसेल,

तर त्यांचे कार्ड थेट बंद करण्यात येते. अशा प्रकरणांमध्ये पुन्हा रेशन मिळवण्यासाठी नव्याने अर्ज करावा लागतो.

हे टाळण्यासाठी नागरिकांनी आपले रेशन कार्ड नियमितपणे वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

विशेषतः ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे किंवा ज्यांनी स्थलांतर केले आहे, त्यांनी आपल्या कार्डाची स्थिती वेळोवेळी तपासावी.

रेशन कार्डसाठी पात्रता सरकारने निश्चित केली आहे आणि ती पूर्ण करणाऱ्यांनाच हा लाभ मिळतो.

पात्र असलेल्या व्यक्तींनी स्थानिक अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज देखील करू शकतात.

सरकारकडून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देताना नियमांचे पालन झाले पाहिजे, यावर भर दिला जात आहे.

त्यामुळे जाणीवपूर्वक किंवा अज्ञानामुळे रेशन न उचलणे ही मोठी चूक ठरू शकते.

Read Also :  https://ajinkyabharat.com/adoption-nor-ran-hoil/

Related News