नवी दिल्ली | १२ मे :
पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेला
“ऑपरेशन सिंदूर” हा निर्णय अत्यावश्यक होता, असं स्पष्ट करताना भारतीय लष्कराचे
Related News
चूकूनही करू नका ही एक चूक
‘याचना नाही आता रण होईल’
विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
काटेपूर्णा अभयारण्यात आज वैशाख पौर्णिमेला मचाणावरून होणार प्राणी गणना
डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सोमवारी स्पष्ट भूमिका मांडली.
राजीव घई म्हणाले, “पाकिस्तानकडून वार होणार याची पूर्ण शक्यता होती आणि त्यासाठी आमची
एअर डिफेन्स सिस्टीम दगडासारखी भक्कम होती. आमचं संरक्षणजाळं भेदता येणं शक्य नव्हतं.
आम्ही आधीच तयारी केली होती.”
त्यांनी सांगितलं की, गेल्या काही महिन्यांतील खोरी मंदिराजवळच्या यात्रा हल्ला,
आणि एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथील पर्यटकांवरील हल्ला, हे दहशतवादाच्या बदललेल्या स्वरूपाची उदाहरणं आहेत.
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता, आणि त्यानंतर आमचं प्रत्युत्तर अपरिहार्य होतं,” असं ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत एअर ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल एअर मार्शल ए. के. भारती यांनीही भूमिका मांडली.
ते म्हणाले, “आमची लढाई केवळ दहशतवाद्यांविरोधात होती.
पण दुर्दैवाने पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांचा पाठिंबा घेतला आणि ही लढाई स्वतःवर ओढवून घेतली.”
भारतीय हवाई दलाने ७ मे रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकी तळांवर अचूक हवाई हल्ले केले.
भारती म्हणाले, “पाकिस्तानची कोणतीही मिसाईल आमच्या संरक्षण जाळ्याला भेदू शकली नाही.
आमच्या हल्ल्यांमुळे केवळ दहशतवादीच नाही तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या यंत्रणांनाही मोठं नुकसान झेलावं लागलं.”
अखेर, ९ ते १० मेच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या एअर लॉजिस्टिक ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला,
पण तो अपयशी ठरला, अशी माहितीही ले. जनरल घई यांनी दिली.
Read Also :
https://ajinkyabharat.com/neet-chief-tayari-karanya-both-vidyadhyanchi-suicide/