भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान

भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान

इस्लामाबाद | १२ मे :

भारताशी झालेल्या लष्करी झटापटीत पाकिस्तानच्या एका फायटर जेटला नुकसान झाल्याची

कबुली अखेर पाकिस्तान सैन्याने दिली आहे. मात्र, त्यांनी या लढाऊ विमानाचे नाव किंवा मॉडेल उघड केलेले नाही.

Related News

रविवारी रात्री उशिरा पाक सैन्य प्रवक्त्याने हे नुकसान ‘कमी प्रमाणात’

असल्याचे सांगितले, मात्र भारताच्या कारवाईचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षानंतर सीमारेषा, हवाई क्षेत्र आणि समुद्रात

सर्व प्रकारच्या कारवाया थांबवण्याचे सीजफायरवर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.

भारताने पाकिस्तानवर जोरदार कारवाई करत ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले.

त्यासह पीओकेमधील दहशतवादी तळ, नियंत्रण रेषेवरील चौक्या आणि अनेक लष्करी ठाणीही उध्वस्त केली.

पाकिस्तानला झालेला हा फटका इतका गंभीर आहे की, ते सावरण्यास त्यांना अधिक

वेळ लागणार असल्याचे लष्करी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

भारतीय लष्कराच्या कारवाईत ३५ ते ४० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, पाक सैन्याने हे देखील स्पष्ट केले आहे की,

भारताचा एकही वैमानिक त्यांच्या ताब्यात नाही आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा बातम्या खोट्या व भ्रामक आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/katepurna-sanctuary-today/

Related News