सतना | ८ मे २०२५ — “गावात वीज येत नाही” अशी तक्रार केवळ मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनवर करणे
एका युवकाला इतके महागात पडेल, याची त्यालाही कल्पना नव्हती. सतना जिल्ह्यातील कोटर विद्युत वितरण केंद्राअंतर्गत
येणाऱ्या निमहा गावातील प्रिन्स यादव या युवकाने सीएम हेल्पलाइनवर वीज न मिळाल्याची तक्रार केली.
Related News
राजस्थानच्या लाठीमधून पाकिस्तानी वैमानिक जिवंत पकडला, JF-17 लढाऊ विमानात होता सवार
अखेर युद्ध पेटलं… पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निष्फळ; भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा, कराचीवर नौदलाचा हल्ला
ऑपरेशन सिंदूर : लाहोरनंतर इस्लामाबादवर हल्ला,
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
चारधाम यात्रेत हेलिकॉप्टरचा अपघात;
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर
संकटांशी झुंज देणाऱ्या उर्वशी संघवी यांचे प्रेरणादायी यश
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम? देशभरात हवाई वाहतूक ठप्प
मुंबईकरांचा प्रवास महागला!
‘या खुदा, आज बचा लो’ – पाकिस्तानच्या संसदेत खासदाराचा भावनिक आवेग
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची बिथरलेली कुरापत:
मात्र चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी जे काही पाहिलं, त्याने सर्वांनाच धक्का बसला.
प्रिन्स यादवकडे कोणताही वैध विद्युत कनेक्शन नव्हता आणि तरीही तो बिनधास्तपणे बोरिंग आणि मोटरपंपसाठी वीज वापरत होता.
वीज विभागाने चौकशी केली असता, बिल किंवा अधिकृत कागदपत्रे नसताना तो वीज वापरत असल्याचं उघड झालं.
यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी युवकाला फटकावलं आणि त्याच्याकडून
सार्वजनिक ठिकाणी कान धरून उठाबशा देखील करून घेतल्या.
ही संपूर्ण घटना व्हिडीओ स्वरूपात सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, जिल्हाभरात ती चर्चेचा विषय ठरली आहे.
विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ अंतर्गत प्रकरण नोंदवण्यात आलं असून,
प्रिन्स यादवला लवकरात लवकर अधिकृत कनेक्शन घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मात्र, उठाबशा घालण्याबाबत विचारले असता, कोटरचे जेई आर. के. तिवारी यांनी सांगितले की,
युवकाने आपली चूक मान्य करत स्वेच्छेने ही शिक्षा घेतली. यामध्ये विभागाची कोणतीही सक्ती नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also : https://ajinkyabharat.com/chardham-yatrett-helicopter-capment/