इस्लामाबाद/नवी दिल्ली | ८ मे २०२५ – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण गडद झालं असून,
त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आला. आजच्या सत्रात पाकिस्तानचे खासदार
ताहिर इक्बाल हे संसदेत भाषण करताना अचानक भावनाविवश झाले आणि फूटाफूट रडू लागले.
Related News
राजस्थानच्या लाठीमधून पाकिस्तानी वैमानिक जिवंत पकडला, JF-17 लढाऊ विमानात होता सवार
अखेर युद्ध पेटलं… पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निष्फळ; भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा, कराचीवर नौदलाचा हल्ला
ऑपरेशन सिंदूर : लाहोरनंतर इस्लामाबादवर हल्ला,
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
“वीज नाही” अशी तक्रार महागात;
चारधाम यात्रेत हेलिकॉप्टरचा अपघात;
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर
संकटांशी झुंज देणाऱ्या उर्वशी संघवी यांचे प्रेरणादायी यश
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम? देशभरात हवाई वाहतूक ठप्प
मुंबईकरांचा प्रवास महागला!
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची बिथरलेली कुरापत:
त्यांनी आवाहन केलं – “या खुदा, आज बचा लो… अल्लाह आमच्या देशाची हिफाजत करो.”
भारतानं पहलगाममधील २६ पर्यटकांच्या निर्घृण हत्येनंतर पाकिस्तानमधील दहशतवादी
तळांवर जोरदार कारवाई करत कठोर संदेश दिला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या तडाख्यामुळे पाकिस्तानच्या लष्करात आणि राजकारणात संभ्रम आणि घबराट निर्माण झाली आहे.
पाकिस्तानकडून मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा अपयशी प्रयत्न
काल रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला.
अमृतसर, जालंधर, लुधियाना, चंदीगड, पठाणकोट, श्रीनगर, आदमपूर आणि फलोदीसह अनेक शहरं लक्ष्य होती.
मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या सर्व मिसाईल्स हवेतच नष्ट केल्या.
भारतीय लष्कराचं प्रत्युत्तर: लाहौरमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त
आज सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या लाहौर शहरामध्ये असलेल्या
हवाई संरक्षण प्रणालींवर अचूक हल्ले करत त्या निष्क्रिय केल्या.
हे प्रतिहल्ले त्याच तीव्रतेने आणि युद्धनैतिकतेनुसार करण्यात आले असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे.
‘परमाणु धमक्या’ थांबल्या; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा पलटलेला सूर
पहलगाम हल्ल्यानंतर सतत भारताला युद्ध आणि परमाणु हल्ल्याच्या धमक्या देणारे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री
ख्वाजा आसिफ यांचा सूर आता पूर्णतः बदललेला दिसतो. एका परदेशी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की,
“भारत जर माघार घेत असेल, तर आम्हीही तणाव कमी करण्यासाठी तयार आहोत. आम्ही युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतोय.”
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoor-nantar-pakistan-bithleli-kurapat/