नवी दिल्ली | 8 मे 2025 — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले.
या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला.
Related News
राजस्थानच्या लाठीमधून पाकिस्तानी वैमानिक जिवंत पकडला, JF-17 लढाऊ विमानात होता सवार
अखेर युद्ध पेटलं… पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निष्फळ; भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा, कराचीवर नौदलाचा हल्ला
ऑपरेशन सिंदूर : लाहोरनंतर इस्लामाबादवर हल्ला,
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
“वीज नाही” अशी तक्रार महागात;
चारधाम यात्रेत हेलिकॉप्टरचा अपघात;
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर
संकटांशी झुंज देणाऱ्या उर्वशी संघवी यांचे प्रेरणादायी यश
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम? देशभरात हवाई वाहतूक ठप्प
मुंबईकरांचा प्रवास महागला!
‘या खुदा, आज बचा लो’ – पाकिस्तानच्या संसदेत खासदाराचा भावनिक आवेग
मात्र, भारताने S-400 ‘सुदर्शन चक्र’ प्रणालीचा वापर करत पाकिस्तानचा हवाई हल्ला हवेतच निष्प्रभ केला.
भारतीय हवाई दलाने काल उशिरा रात्री देशाच्या संरक्षण इतिहासात एक निर्णायक पाऊल उचलत S-400
क्षेपणास्त्र प्रणालीच्या सहाय्याने आक्रमक हल्ल्याचे लक्ष्य अचूकपणे भेदले.
ही प्रणाली 400 किलोमीटरपर्यंत कोणतेही हवाई लक्ष्य भेदू शकते आणि ती अमेरिका, चीनसारख्या बलाढ्य
राष्ट्रांच्या हत्यारांनाही रोखू शकते, असं संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अत्याधुनिक रशियन प्रणाली भारतासाठी ‘गेम चेंजर’
2018 मध्ये रशियाकडून भारताने तब्बल 5 अब्ज डॉलर्सच्या करारातून S-400 प्रणाली विकत घेतली.
यातील काही युनिट्स भारतात कार्यरत असून, संवेदनशील सीमांवर तैनात आहेत. या प्रणालीमुळे पाकिस्तानसारख्या शेजारी
देशांकडून होणारे हवाई हल्ले यशस्वीपणे परतवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.
हल्ल्याचे ठिकाण किंवा पाकिस्तानने दागलेल्या क्षेपणास्त्रांचे नेमके स्वरूप अद्याप उघड झालेले नाही.
मात्र, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हे संभाव्य घातक हल्ले होते. भारताने ‘फायर बिफोर फॉग’
नीती वापरत अचूकतेने आणि वेळीच प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे कोणताही मोठा अनर्थ टळला.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoorwar-cm-yoginchi-clear-role/