22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला भारताने
‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. या सैनिकी कारवाईत भारताने पाकिस्तान
आणि पाक अधिकृत काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
Related News
अकोट तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठे नुकसान
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
या धाडसी कारवाईनंतर देशभरात, तसेच राज्यात आनंदाचे आणि देशभक्तीने भारलेल्या वातावरणाची लाट उसळली आहे.
अकोल्यातही ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात असून, मोहम्मद अली चौकात मुस्लिम बांधवांनी फटाके फोडत,
मिठाई वाटून आणि घोषणा देत ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद व्यक्त केला.
नमाज अदा केल्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि भारतीय सेनेचे अभिनंदन केले.
यावेळी “भारतीय सेना जिंदाबाद”, “आमचा देश, आमचा अभिमान” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
उपस्थितांनी सांगितले की, “देशहितासाठी जी कारवाई झाली आहे, ती योग्य आणि आवश्यक होती. दहशतवादाचा अंत होणे गरजेचे आहे.”
या घटनेने अकोल्यातील सामाजिक सलोखा आणि राष्ट्रनिष्ठा याचे एक सकारात्मक उदाहरण समोर आले आहे.
देशभक्ती ही केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून, ती सर्व भारतीयांची सामूहिक भावना आहे, हे या दृश्यातून स्पष्ट झाले.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-shiva-naikoon-sainikana-salaam-ladu-watoon-jallosh/