गुरुग्राम | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या
लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी स्वामी नरवाल यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Related News
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
त्या गुरुग्राम येथील त्यांच्या निवासस्थानी एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
या भावुक संवादात त्यांनी अश्रूंनी भरलेल्या आवाजात सांगितलं – “ही कारवाई इथेच थांबू नये, दहशतवाद पूर्णतः नष्ट झाला पाहिजे.”
हिमांशी म्हणाल्या, “माझ्या पतीने सैन्यात प्रवेश घेतला तो देशात शांतता यावी म्हणून.
आज तो माझ्यासोबत नाही, पण त्याचा आत्मा ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होता असं मला वाटतं.
मी सरकारकडे विनंती करते की विनयला शहीदाचा दर्जा मिळायला हवा.”
“ऑपरेशन सिंदूर” हे नाव योग्यच – हिमांशी
हिमांशी म्हणाल्या, “या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देणं अतिशय योग्य आहे.
माझं लग्न नुकतंच झालं होतं… पण एका क्षणात माझं संपूर्ण आयुष्य उलथून गेलं.
ज्या महिलांनी आपल्या पतीला गमावलं, त्यांचा दु:ख मी जाणते. त्यामुळे अशा प्रकारचं काही पुन्हा घडू नये.”
“महिलांनी अशा ऑपरेशन्समध्ये पुढे यावं”
भारतीय लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भाग घेतल्याबद्दल हिमांशी म्हणाल्या,
“हे एक प्रेरणादायी पाऊल आहे. एक महिला दुसऱ्या महिलेच्या वेदना समजू शकते. अशा कारवायांमध्ये अधिक महिलांना संधी मिळावी.”
“मी ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही”
काही जुन्या वक्तव्यांवरून सोशल मीडियावर ट्रोल केल्याबद्दल हिमांशी म्हणाल्या,
“लोकांची मानसिकता मी बदलू शकत नाही. पण कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये, एवढंच मला वाटतं.”
शेवटी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “घटनेच्या वेळी विनयकडे शस्त्र असतं,
तर तो निश्चितच दहशतवाद्यांना उत्तर दिलं असतं. ते देशासाठी सर्वोच्च सन्मानाचे पात्र आहेत.”
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduramadhye/