पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.
अर्धसैनिक दलांच्या प्रमुखांना त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की,
Related News
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
सुट्टीवर गेलेले जवान तात्काळ सेवा स्थळी परतावेत, तसेच सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवण्यात यावी.
गृहमंत्री अमित शाह हे जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा
आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी सतत संपर्कात असून,
सीमावर्ती नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी बंकर सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शाह यांनी म्हटलं की, “ऑपरेशन सिंदूर हे निर्दोष भारतीयांच्या हत्येला दिलेले कठोर उत्तर आहे.
मोदी सरकार देशावर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला तितक्याच ताकदीनं उत्तर देणार आहे.
भारत दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून,
ऑपरेशन सिंदूरबाबतचा ठराव पारित होण्याची शक्यता आहे. बैठकीत सुरक्षा विषयक समिती (CSC) सद्यस्थितीचा आढावा घेणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mehi-mell/