पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ७ मे रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’
अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत जशास तसे उत्तर दिले.
या निर्णायक कारवाईमुळे फक्त पाकिस्तानच नव्हे, तर त्यांच्या कायमस्वरूपी पाठीराख्या असलेल्या चीनलाही हादरा बसला आहे.
Related News
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा अकोला दौरा; अकोट येथे विवाह समारंभास उपस्थिती
संशयास्पद माहितीवर विश्वास ठेवू नका;
सराफा दुकानात पुन्हा ‘बंटी-बबली-आजी’ टोळीचा हात;
अकोल्यातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात मोठा खुलासा; किरीट सोमय्यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
आपत्कालीन स्थितीसाठी तयार राहा!
चेन चोरी करणाºया महिलेला सहा तासात केली अटक
मान्सून लवकर येणार! महाराष्ट्रात १० जूननंतर पावसाची शक्यता
भारतीय सेनेला विराट कोहलीचा सलाम
सायरन कधी वाजतो? – हवाई हल्ल्याच्या धोक्यावेळी नागरिकांना मिळतो किती वेळ वाचण्यासाठी?
जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे आवाहन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही दलप्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक;
सध्या परिस्थितीत चीनने पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असं काहीही टाळावं, अशा शब्दांत चीनने आपली भूमिका मवाळ केली आहे.
भारत आणि पाकिस्तानने शांततेने प्रश्न सोडवावा, असेही आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलं आहे.
विशेष म्हणजे, भारताच्या हल्ल्यापूर्वी फक्त तीन दिवसांपूर्वीच चीनच्या राजदूतांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांची
भेट घेऊन “बिनशर्त पाठिंबा” जाहीर केला होता. पण भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अवघ्या तीन दिवसांत चीनचा सूर पूर्णपणे बदलला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं, “भारत आणि पाकिस्तान हे आमचे शेजारी आहेत.
आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. दोघांनीही संयम पाळावा आणि शांतता राखावी, हे आमचं मत आहे.”
भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची अडचण वाढवली असून, त्यांच्या पाठीशी उभा असलेला एकमेव बलाढ्य देशही
आता सावध पवित्रा घेत आहे. या घडामोडींमुळे भारताने केवळ दहशतवाद्यांवर नाही,
तर आंतरराष्ट्रीय राजकारणातही आपलं सामर्थ्य दाखवलं आहे.