अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त ६ महत्त्वाचे निर्णय

अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त ६ महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या

ऐतिहासिक राज्य मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी

होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त राज्य सरकारने सहा महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

Related News

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “परकीय आक्रमणांमुळे भारतातील अनेक श्रद्धास्थानांचे अस्तित्व नष्ट झाले.

मात्र त्या स्थळांचे पुनर्जीवन करण्याचे महान कार्य अहिल्यादेवींनी केले.

त्यांच्या स्मृती जपण्यासाठी चौंडी येथे ६८१ कोटी रुपयांचा स्मृतिस्थळ संवर्धन आराखडा स्वीकारण्यात आला आहे.”

या आराखड्यात विविध पायाभूत सुविधा, सांस्कृतिक केंद्र, अभिलेख संग्रहालय,

भक्तनिवास, परिसर विकास आदी कामांचा समावेश असून, हे स्मृतिस्थळ अखिल भारतीय स्तरावर एक प्रेरणास्थान ठरेल,

असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे चौंडी परिसराचा सर्वांगीण विकास वेगाने होणार आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/kagiso-rabadachi-mothi-rejuvenation-declaration/

Related News