पाकिस्तान ध्वजावाहक जहाजांना भारतात प्रवेशबंदी

पाकिस्तान ध्वजावाहक जहाजांना भारतात प्रवेशबंदी

नवी दिल्ली | प्रतिनिधी

भारत सरकारने देशाच्या समुद्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानच्या ध्वजाखाली चालणाऱ्या कोणत्याही जहाजाला आता भारतीय बंदरांवर प्रवेश देण्यात येणार नाही.

Related News

तसेच, भारतीय ध्वजावाहक जहाजांनाही पाकिस्तानातील कोणत्याही बंदरावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

पोर्ट्स, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून,

या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ आणि काटेकोरपणे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दोन्ही देशांमधील वाढता तणाव आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

समुद्री धोरणात मोठा बदल

हा निर्णय भारताच्या समुद्री धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे.

या बंदीमुळे भारताच्या समुद्री हद्दीत परकीय धोका रोखण्यास मदत होईल आणि देशाची आर्थिक व व्यापारी सुरक्षाही अधिक मजबूत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काय आहे पुढचा टप्पा?

सरकारने बंदर प्राधिकरणांना या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच, सीमा शुल्क, नौदल आणि तटरक्षक दलांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे,

जेणेकरून कोणतीही पाकिस्तान ध्वजावाहक जहाजे भारतीय जलसीमेच्या आत शिरू शकणार नाहीत.

Read Also : https://ajinkyabharat.com/prem-sangabhaye-chidlelya-pityache-rakshasi-roop/

Related News