अकोला, प्रतिनिधी | अकोला शहरातील नवीन उड्डाणपुलावर घडलेल्या दुचाकी अपघातात एका
२५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे.
संतोष वनवासे (वय २५, मूळ रहिवासी उत्तर प्रदेश) असे मृत युवकाचे नाव आहे.
Related News
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या लष्करी प्रतिउत्तराचे नेतृत्व महिलांच्या हाती…
‘ऑपरेशन सिंदूर’मागे एक सळसळती नायिका – कर्नल सोफिया कुरेशी!
पंतप्रधान मोदींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक
‘ऑपरेशन सिंदूर’: पल्लनगाम हल्ल्याचा सूड, मोदींच्या प्रतिशोधाने दहशतवादाला हादरा
ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी कारवाईची शक्यता?
“मीही मेलो असतो तर…”; मसूद अजहरची कुटुंबहानीनंतर पहिली प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची स्पष्ट भूमिका; “मुंबई २६/११ नंतरचा सर्वात मोठा हल्ला”
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानींचा गुगलवर सर्च: “ये सिंदूर होता क्या है?”
पहलगाम हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर; अकोल्यात विश्व हिंदू परिषदेचा जल्लोष
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर चीनची टरकली; पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला
ऑपरेशन सिंदूरनंतर वीरेंद्र सेहवाग, रैना आणि राहुल गांधी यांची भारतीय लष्कराला सलामी
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची दहशतवाद्यांवर सर्जिकल स्ट्राइक
तो अकोला शहरात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करीत होता.
गाडी घसरून पुलाच्या भिंतीला धडक
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष वनवासे यांची दुचाकी अचानक घसरली आणि
पुलाच्या कडेला असलेल्या भिंतीला जोरदार धडकली. धडकेनंतर त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरू झाला,
आणि काही क्षणांतच त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांनी घटनास्थळी दाखल
होऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरु असून,
अत्यधिक वेग, रस्त्याची अवस्था किंवा तांत्रिक बिघाड या कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना घडली, याचा शोध घेण्यात येत आहे.
अकोल्यातील नवीन उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच असल्यामुळे नागरिकांनी अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jhansi-dj-vajavaliya-vadatun-gondha/