पहलगाम हल्ल्यानंतर अकोल्याचे ३१ पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले;

पहलगाम हल्ल्यानंतर अकोल्याचे ३१ पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले;

अकोला

काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या घटनेचा परिणाम अकोल्याच्या पर्यटकांवरही झाला असून, अकोल्यातील ३१ पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत.

Related News

हे सर्व पर्यटक १८ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान ‘गुरुमाऊली टूर्स’च्या माध्यमातून काश्मीर दौऱ्यावर गेले होते.

मात्र, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पुढील प्रवास तात्काळ थांबवला आहे.

स्थानीय नागरिकांनी दिला आधार, पर्यटक सुखरूप

सध्या हे पर्यटक श्रीनगरमध्ये थांबले असून, तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांना

सहकार्य व मदत केली असल्यामुळे ते सर्वजण सुखरूप आहेत,

अशी माहिती मिळाली आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, हे पर्यटक मिळेल त्या मार्गाने अकोल्यात परत यायला इच्छुक आहेत.

परतीसाठी राज्य सरकारकडे मदतीची मागणी

पर्यटकांनी लवकरात लवकर अकोल्यात परतण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली आहे.

त्यासाठी यंत्रणांनी तात्काळ हालचाली करून सुरक्षित परतीची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा पर्यटकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/chorla-stuck-stolen/

Related News