अकोला | 14 एप्रिल 2025:
अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील उगवा गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
जवळपास 15,000 लोकसंख्या असलेल्या या गावात महिन्योनमहिने नळाला
Related News
सोनं लखटक्याच्या उंबरठ्यावर,चांदीलाही टाकलं मागे; लग्नसराईत खरेदीदारांचे डोळे पांढरे
लखनऊच्या मॉलमागे चालणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा;
आमदार हरीश पिंपळे यांच्याशी वाद प्रकरणाचा परिणाम
डीआरडीओ स्टिकर पाहून विंग कमांडरवर हल्ला;
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी:
पंजाबच्या मोगा शहरात धक्कादायक घटना —
भाजप आमदार हरीश पिंपळेंचा ठाणेदारावर गंभीर आरोप;
आगरा: भाजप नेत्याच्या गाडीने सिग्नल तोडून कारला धडक;
जानोरी मेळ जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था;
अश्विनी बिद्रे हत्याकांड: मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप;
पोप फ्रान्सिस यांचे निधन; 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
१४ वर्षांच्या वयात IPL मध्ये धडाकेबाज पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची प्रेरणादायी कहाणी
पाणी न येण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी नागरिक त्रस्त असून,
पाणी चोरीच्या भीतीने पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून ठेवावे लागत आहे.
पाण्यासाठी टाक्यांना कुलूप, लग्नासाठी मुली नाहीत…
गावातील नागरिकांनी सांगितले की, “64 खेडी पाणी योजनेतून महिन्यातून एखाददाच पाणी येतं,”
त्यामुळे मिळालेलं पाणी कोण चोरून नेईल याची भीती असल्याने टाक्यांना कुलूप लावून ठेवावं लागतं.
गावात बहुतेक सर्वजण शेतकरी असल्याने दिवसभर शेतात असतात,
अशावेळी घरात कोण नसल्यामुळे पाणी चोरीचे प्रकार घडू लागले आहेत.
लग्नासाठीही अडचणी
या समस्येचं गंभीर वास्तव सांगताना काही ग्रामस्थ म्हणाले, “गावात पाणी नाही म्हणून
आमच्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झालाय.
पाणी नसल्याने मुलींचे आई-वडील या गावात लग्न करायलाच तयार नाहीत.”
हे शब्द गावकऱ्यांच्या वेदनेचं प्रतिक आहेत.
शासनाच्या योजनांचा लाभ नाही
गावात लाखो रुपयांचे सरकारी निधीच्या माध्यमातून पाणी योजना राबवल्या गेल्या,
मात्र प्रत्यक्षात पाण्यासाठी नागरिकांना अजूनही मैलोनमैल पायपीट करावी लागते.
यामुळे शासनाच्या योजना कागदावरच राहत असल्याचं चित्र स्पष्ट होतं.
गावकऱ्यांची मागणी
गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
खारपाण पट्ट्यातील गावांना विशेष योजना करून सतत आणि पुरेसं
पाणी पुरवठा करण्याची गरज आहे, असं ग्रामस्थ ठामपणे सांगतात.
Read Also : https://ajinkyabharat.com/ashwini-bidre-massacre-main-accused-abhay-kurundkarla-birthplace/