मुंबई | 14 एप्रिल 2025:
2016 मध्ये घडलेल्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली आहे.
मुख्य आरोपी आणि पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Related News
देशातील सर्वात मोठी बँक 12हजार कर्मचारी भरणार; 250 नव्या शाखा उभारणार
बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी; क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये होणार भरती
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल...
Continue reading
इंडोनेशियात ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; 50 हजार फूट उंचीवर राख, 200 हून अधिक उड्डाणे रद्द
इंडोनेशियात प्रसिद्ध अनाक क...
Continue reading
भारत-बेल्जियम संबंध : पाकिस्तानबाबत बेल्जियमचे भारताला महत्त्वाचे आश्वासन?
संरक्षण सहकार्याबाबत चर्चेला उधाण; पाकिस्तानला लष्करी साहित्य न देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती
भारत आ...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा हाहाकार? चौलानी नदीवर भूस्खलनामुळे महापुराचा धोका
जलप्रलयानंतर आणखी मोठा हायअलर्ट; नदीचा प्रवाह बाधित, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश
Continue reading
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा
‘येत्या काही दिवसांत सर्व कळेल, कोणीच शिल्लक राहणार नाही’; ठाकरे गटातील संभाव्य फोडाफोडीवरून राजकीय वाताव...
Continue reading
डीजेला विरोध करणारे बापटच DJ वर नाचले! AI व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ
Vidyanand Bapat DJ Dance Video : पुण्यात गणेशोत्सव आण...
Continue reading
‘मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?’; Prime Minister Modiची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय; कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सुकर
जालना जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरे; तक्रारींच्य...
Continue reading
Vinod Tawde चा उत्तर प्रदेशात मोठा प्लॅन; आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यावर भर
Vinod Tawde चा मोठा डाव : उत्तर प्रदे...
Continue reading
कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी; एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
जन्माष्टमीचा आनंद शोकात बदलला; माळेतील मणी गिळल्याने सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुलांना सजव...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
तब्बल नऊ वर्षांनी या प्रकरणात न्याय मिळाला असून, यामुळे बिद्रे कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
2016 मध्ये नवी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे अचानक बेपत्ता झाल्या.
तपासाअंती स्पष्ट झाले की, 11 एप्रिल 2016 रोजी त्यांचे अपहरण करून गळा दाबून हत्या करण्यात आली होती.
मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने ही हत्या आपल्या तीन मित्रांच्या मदतीने केली.
हत्यानंतर बिद्रे यांचा मृतदेह लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून वसईच्या खाडीत फेकण्यात आला होता.
काही तुकडे समुद्रात तर मृतदेहाचा धड फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा नंतर समोर आला.
हत्या कशी घडली? – तपशीलवार घटनाक्रम
अश्विनी बिद्रे (वय 42) या नवी मुंबई पोलीस दलात मानवाधिकार विभागात कार्यरत होत्या.
11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास त्या अभय कुरुंदकरला भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या.
त्यानंतर कुरुंदकरने त्यांना कारमध्ये घेऊन भाईंदरकडे रवाना झाले.
कारमध्येच गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी कुरुंदकरसोबत महेश फळणीकर हा उपस्थित होता.
त्याच रात्री 11:18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाला, आणि त्या क्षणापासून त्या बेपत्ता झाल्या.
पुढे कुरुंदकरने राजू पाटील, महेश फळणीकर आणि चालक कुंदन भंडारी यांच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकले.
काय झाले होते तपासात?
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला संथ गतीने चालला होता. आरोपी स्वतः पोलीस असल्यामुळे तपासात अडथळे आले,
असा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला होता. अखेर हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आणि यानंतरच हत्येचा उलगडा झाला.
महेश फळणीकर याने दिलेल्या कबुलीमुळे या प्रकरणातील अनेक धागेदोरे उघडकीस आले.
न्यायालयाने सर्व आरोपींच्या जबाबांची छाननी करत मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उर्वरित आरोपींवरही खटला सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pope-francis-yanche-died-88-years-old-ghetla-akhercha-breathing/