नवी दिल्ली :
केवळ १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी याने शनिवारी IPL मध्ये पदार्पण करताच आपल्या खेळीने साऱ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले.
शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत त्याने सर्वांना चकित केलं.
Related News
R Madhavan lookalike spotted in Kalyan Fast Train goes viral! Watch how this viral moment created a frenzy among Mumbai local passengers and social ...
Continue reading
ऐश्वर्या राय भावनिक पोस्ट: वडिलांच्या आठवणी आणि आराध्याच्या वाढदिवसाचा विशेष क्षण
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ने नुकताच सोशल मीडियावर भावनिक पोस्ट...
Continue reading
न्यू तापडिया नगरात बिबट्याचा उधळलेला कहर! पहाटेच्या शांततेला वन्यभीतीची झळ—नागरिकांमध्ये प्रचंड दहशत
अकोला : शहरातील शांत परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यू
Continue reading
विवाहित महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सायबर फसवणूक – चिक्कबल्लापुरातील मोठा घोटाळा
सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत असून, सोशल मीडियाचा...
Continue reading
जोरात आरडले-ओरडले डोनाल्ड ट्रम्प! व्यापार करारादरम्यान संतापाचा स्फोट; टॅरिफ चर्चेतून भडका, पुढे ‘चिरकत’ सफाई
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असलेले ...
Continue reading
Pakistan-China : अमेरिकेने जवळ करताच पाकिस्तानचे ‘खरे रंग’; चीनला थेट इशारा“जमत नसेल तर पाकिस्तान सोडा!”
आंतरराष्ट्रीय राजकीय पटावर जगातील महाशक्तींच्या नातेसंबंधांत वेगाने बदल हो...
Continue reading
Hardik Pandya Marriage: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा गुपचूप लग्न? सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेला उधाण
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल ...
Continue reading
Parineeti Chopra–Raghav Chadha यांच्या लेकाचं नाव जाहीर; अर्थ अतिशय खास, पाहा पहिला फोटो
बॉलिवूड अभिनेत्री Parineeti Chopra आणि आम आदमी पक्षा...
Continue reading
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद; अनगर नगरपंचायत निवडणुकीत हाय-व्होल्टेज ड्रामा
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत रविवारी घडलेल्या घटनांनी राजकीय तापमान प्रचंड वाढवले आहे. राष...
Continue reading
Kiran Gaikwad Social Media Detox या अचानक घेतलेल्या निर्णयामागचं खरं कारण काय? देवमाणूस फेम अभिनेत्याच्या निर्णयाने चाहते हादर...
Continue reading
बाळापुर : 15 नोव्हेंबर 2025 रोजी बाळापूर शहरात बाळापुर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष...
Continue reading
Parineeti Chopraशेअर करते “जुगाड मेकअप” रूटीन – १० मिनिटांत दिसा ताजगी आणि तेजस्वी
बॉलिवूड अभिनेत्री आणि नव्या आई Parineeti Chopra तिच्या मेक...
Continue reading
मात्र ही प्रतिभा एका रात्रीत घडलेली नाही. या यशामागे त्याच्या वडिलांचे, प्रशिक्षकांचे
आणि अनेकांच्या अथक परिश्रमांचे योगदान आहे.
वैभवच्या क्रिकेट स्वप्नांना उंच भरारी द्यावी म्हणून त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी
आपल्या शेतीची जमीन विकून त्याला संधी दिली.
पटण्याचे क्रिकेट प्रशिक्षक मनीष ओझा यांनी या विशेष गुणी मुलामध्ये असलेली क्षमता ओळखली.
त्यांनी १० वर्षांच्या वैभवला दररोज किमान ६०० चेंडूंचा सामना करायला लावून त्याला मोठ्या स्पर्धांसाठी तयार केलं.
राजस्थान रॉयल्सच्या राहुल द्रविड आणि जुबिन भरूचा यांनीही त्याला झगमगता तारा बनवण्यासाठी मेहनत घेतली.
त्यांनी आयपीएलपूर्वी त्याला १५० किमी प्रतितास वेगाने साइड-आर्म थ्रोडाउनचा सामना करवून दिला.
हे सगळं वैभवसाठी मोठं आव्हान होतं, पण त्याने ते यशस्वीरित्या पार केलं.
आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल १.१० कोटी रुपयांना विकत घेतलं.
त्याचे प्रशिक्षक म्हणाले, “तुम्ही त्याचा शॉट पाहिला, बॅटची स्विंग आणि टायमिंग पाहिलं.
फक्त ताकदीवर षटकार लागत नसतात, नाहीतर सगळे पैलवान क्रिकेटर झाले असते.
ही त्या मुलाच्या पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण सरावाची फळं आहे – रोज ६०० चेंडूंचा सामना, हे सोपं नाही.”
आज वैभव सूर्यवंशी केवळ एक खेळाडू नाही, तर लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे,
ज्याच्या यशामागे त्याचा संघर्ष, त्याचे कुटुंब आणि प्रशिक्षकांचे कर्तृत्व आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhajinagamadhyaye/