“स्वच्छ अकोला, सुंदर अकोला” – प्लास्टिक विरुद्ध एकजूट!

“स्वच्छ अकोला, सुंदर अकोला” – प्लास्टिक विरुद्ध एकजूट!

अकोला :

‘स्वच्छ अकोला, सुंदर अकोला’ या सामूहिक स्वप्नाच्या दिशेने आजचा दिवस विशेष महत्त्वाचा ठरला आहे.

शहरातील गांधी चौक, रामदासपेठ-टिळक पार्क आणि राऊतवाडी या तीन प्रमुख भागांमध्ये

Related News

प्लास्टिक कॅरीबॅग, नाही रे बाबा, नकोच!” असा ठाम निर्धार करत विशेष स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

या मोहिमेचं खास वैशिष्ट्य म्हणजे —

“घरोघरी स्वच्छता ठेवतो आपण, पण रस्त्यांवर, कोपऱ्यांमध्ये आणि नाल्यांमध्ये पडलेला ‘कोणाचाही नसलेला’

कचरा उचलायचं काम कोण करतं?” — याच प्रश्नाचं उत्तर देत शहरातील सामाजिक कार्यकर्ते,

युवक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने पुढे आले

आणि रस्त्यांवर पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छतेचा संदेश दिला.

या उपक्रमातून फक्त सफाईच नाही तर जनजागृतीही करण्यात आली.

प्लास्टिकमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान, पाण्याच्या प्रवाहांवर

होणारा परिणाम आणि स्वच्छतेबाबतचा नागरिकांचा सहभाग यावर भर देण्यात आला.

अकोलावासीयांनी एकत्र येऊन दाखवलेली ही एकजूट निश्चितच शहराच्या स्वच्छतेसाठी प्रेरणादायी आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/debt-waiver-thackeray-gesture-rosie-tractor-front-in-2/

Related News