अजिंक्य भारत प्रतिनिधी | जानोरीमेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील गजबजलेल्या मोखा गावात जानोरीमेळ गट ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराचा प्रत्यय
सध्या ग्रामस्थांना येत आहे. ऑक्टोबर २०२४ पासून ग्रामपंचायतीच्या कचरा पेट्या
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
विद्यमान सरपंचांच्या घरी धूळ खात पडून आहेत. सहा महिन्यांनंतरही या पेट्यांचे अद्यापही वितरण झालेले नाही.
ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की, “मोखा आणि जानोरीमेळ या दोन्ही
गावांमध्ये कचरा पेट्यांचे वाटप होणे बाकी आहे. जानोरीमेळसाठी स्वतंत्र घंटागाडी
आणण्याची प्रक्रिया गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे.
येत्या २५ ते २७ एप्रिलदरम्यान पेट्यांचे घरोघरी वितरण केले जाणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
घंटागाडी वापराबाहेर, अपंग निधीही रखडला
सदर ग्रामपंचायतीने आणलेली घंटागाडीही सद्यस्थितीत निष्क्रिय आहे.
यासंदर्भात ग्रामसेवकांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीचा एक
कर्मचारी अपघातग्रस्त झाल्यामुळे या वितरण प्रक्रियेला विलंब झाला.”
तसेच, अपंग नागरिकांसाठी असलेला शासनाचा निधीही अद्याप वितरित झालेला नाही.
या निधीचे वितरणही कचरा पेट्यांप्रमाणे पुढील आठवड्यातच करण्याचे आश्वासन ग्रामसेवकांनी दिले.
ग्रामस्थांमध्ये नाराजी, कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “सार्वजनिक सुविधांसाठीचा निधी
आणि साहित्य जर अशा प्रकारे ठेवून दिला जाणार असेल,
तर ग्रामपंचायत प्रशासनाची कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं,”
अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/avakali-pavasacha-vanisah-complex-tadakha/