अकोल्यात काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद;

अकोल्यात काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद;

अकोला |

14 एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातील जुन्या बसस्थानकावर साकारण्यात

आलेल्या भव्य रांगोळीवरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्यरात्री

Related News

शाब्दिक वाद निर्माण झाला. सुमारे 18 हजार चौरस फूट जागेत रांगोळीतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली होती,

मात्र या प्रतिमेजवळ काँग्रेसचे ‘पंजा’ चिन्ह देखील रेखाटल्याचे दिसून आले.

यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

रात्री उशिरा वंचितचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि हातात झाडू घेऊन ‘पंजा’ चिन्ह पुसून टाकलं.

यानंतर काँग्रेस आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये तब्बल चार तास वाद झाला.

या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे म्हणाले,

“बाबासाहेबांना काँग्रेसने दोन वेळा पराभवाचा सामना करायला लावला.

त्यामुळे बाबासाहेबांच्या नावाचा आणि प्रतिमेचा राजकीय उपयोग होऊ देणार नाही.”

सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, घटनेने राजकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे.

प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/maharashthal-mahayati-sarkarmadhyaye-punha-vad-shinde-ani-ajitdada-program/

Related News