अजिंक्य भारत प्रतिनिधी | कळंबी महागाव
बाळापूर तालुक्यातील कळंबा खुर्द येथे तक्षशिला बौद्ध विहारात 11 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा
फुले यांची 198 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
शैक्षणिक क्रांतीसाठी जीवन अर्पण करणाऱ्या महापुरुषांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी
आयोजित या कार्यक्रमात गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन कळंबी महागाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष कडू सावळे
आणि पत्रकार श्रीकृष्ण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सिद्धू सावळे यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर सखोल माहिती दिली.
त्यांनी महात्मा फुले यांचे शिक्षण, महिलांसाठी केलेले कार्य, सत्यशोधक समाजाची स्थापना आणि सामाजिक समतेसाठी दिलेल्या
योगदानाचा उल्लेख केला. याचबरोबर मोतीराम सावळे यांनीही आपल्या भाषणातून महात्मा फुले यांचे प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमाला महादेव भाऊजी सावळे, दादाराव सावळे, गजानन पदमने, धम्मपाल सावळे, गजानन सावळे,
उज्ज्वल सावळे, कौशल्या वानखडे, विमल सावळे, देवकाबाई सावळे, केसरबाई सावळे, सुनिता सावळे, सुनंदा सावळे,
रेणुका सावळे, कांताबाई सावळे, राजकन्या सावळे, कलावती सावळे, शोभाबाई अंभोरे, रुखमाबाई सावळे, रेखा सावळे,
बालाबाई सावळे, प्रीती सावळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकाजी सावळे यांनी तरतरीतपणे केले. उपस्थित सर्वांनी
महात्मा फुले यांच्या विचारांचे स्मरण करत समाज परिवर्तनासाठी त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.