शाहबाबू विद्यालयात शाह अब्दुल अजीज (र.अ.) यांची पुण्यतिथी साजरी

शाहबाबू विद्यालयात शाह अब्दुल अजीज (र.अ.) यांची पुण्यतिथी साजरी

पातूर (प्रतिनिधी)

शाहबाबू एज्युकेशन सोसायटी संचालित शाहबाबू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पातूर येथे संस्थेचे संस्थापक

हजरत शाह अब्दुल अजीज (र.अ.) यांच्या पुण्यतिथीनिमित्त “तजकिरा-ए-शाहबाबू” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Related News

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सैय्यद इसहाक राही सर होते. पातूर शहर आपल्या नैसर्गिक सौंदर्य,

प्राचीन मंदिरे, तसेच हजरत शाहबाबू (र.अ.) यांच्या आध्यात्मिक वारशासाठी प्रसिद्ध आहे.

रमजान संपल्यानंतर, उर्दू महिना शव्वालच्या ११व्या तारखेला हजरतजींची पुण्यतिथी साजरी केली जाते.

पुण्यतिथीनिमित्त निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, तसेच शाहबाबू यांच्या जीवनावर आधारित तजकिरा कार्यक्रम घेण्यात आला.

शिक्षकांनी ईश्वर चिठ्ठीद्वारे हजरतजींच्या कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात सैय्यद इसहाक राही सर यांनी हजरतजींचे उपदेश, सामाजिक ऐक्य,

आणि सत्य व नैतिकतेच्या मार्गाचे महत्त्व अधोरेखित करत, विद्यार्थ्यांना समाजाभिमुख जीवन जगण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला प्राचार्य मुजीबउल्ला खान, अकोला व आलेगाव येथील मुख्याध्यापक मोहम्मद आरिफ, मोबीन शेख,

रुबिना मॅडम, नफिस इकबाल सर, तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मोहम्मद असगर, वहिद सर,

सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन नासीर खान सर यांनी तर आभार प्रदर्शन रेहान अहमद सर यांनी केले.

Related News