पातुर (प्रतिनिधी) –
अवैध गौण खनिज म्हणजेच मुरूमची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर नायब तहसीलदारांच्या तत्पर कारवाईत पकडण्यात आले.
ही कारवाई दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास अंबासी गावाजवळ करण्यात आली.
Related News
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
नायब तहसीलदार बळीराम चव्हाण हे दौऱ्यावरून परतत असताना त्यांना रस्त्यावर मुरूमने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली आढळली.
त्यांनी तातडीने कारवाई करताच, ट्रॅक्टर चालकांनी शासकीय अधिकाऱ्यांना पाहताच वाहने सोडून पोबारा केला.
या घटनेत एक ट्रॅक्टर (क्र. MH 30 AB 5787) आणि दुसरे लाल रंगाचे ट्रॅक्टर, ज्यावर नंबर नव्हता,
असे दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जप्त करण्यात आले. यामध्ये चालक मुजाहिद खान युसुफ खान,
आसिफ खान, शेख फैजान, शेख जब्बार आदींचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जप्त केलेली वाहने पातुर पोलीस ठाण्यात आणून जमा करण्यात आली असून,
तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांच्या आदेशापर्यंत ती पोलिस कोठडीत राहणार आहेत.
या कारवाईमुळे अवैध खनिज वाहतुकीवर नियंत्रण आणण्याच्या
दृष्टीने प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.