अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
शनिवार, दिनांक १२ एप्रिल रोजी होणाऱ्या या उत्सवात प्रथमच
प्रयागराज कुंभमेळ्याच्या देखाव्याचे विशेष आकर्षण असणार आहे.
या देखाव्यात त्रिवेणी संगम, श्रीराम दरबार, काशी तीर्थक्षेत्र, देव-दानव समुद्रमंथन
यांचा भव्य आणि भक्तीभावाने परिपूर्ण प्रस्तुतीकरण होणार आहे.
उत्सवाची सुरुवात सकाळी ५.३० वाजता भगवंताच्या जन्मसोहळ्याने होईल.
यजमान म्हणून उद्योजक नंदकुमार अलीमचंदानी आणि राहुल मित्तल कुटुंबीयांसह सहभागी होणार आहेत.
मुख्य कार्यक्रम:
-
११ एप्रिल: सायंकाळी ७ वाजता सामूहिक सुंदरकांड व हनुमान स्तोत्र पठण
-
१२ एप्रिल: हनुमान जन्मोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रम
-
१४ एप्रिल पर्यंत: भव्य देखावे दर्शनासाठी खुले
इतर आकर्षणं:
-
सेल्फी पॉइंट्स
-
बालकांसाठी उद्यान व खेळांची सोय
-
पूजा साहित्य व स्टॉल्स
-
रंगीत रोषणाई व फुलांची सजावट
-
दर्शनासाठी विशेष व्यवस्था
सालासर बालाजी सेवा समितीने सर्व भाविकांना या भक्तिमय उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सेवाधारी व पदाधिकाऱ्यांचे मोठे योगदान सुरू आहे.