अकोला – अकोला जिल्ह्यातील कासमपूर पळसो गावात काही दिवसांपूर्वी एका
रुग्णामध्ये कॉलराची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो कासमपूरच्या वैद्यकीय पथकाने तत्काळ
Related News
अजितदादांच्या अपघातावर राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
‘पुतण्या काकासाठी लढतोय’; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं रोहित पवारांकडून समर्...
Continue reading
महाराष्ट्र पुन्हा हादरला! खासगी शाळेच्या बस चालकाकडून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
नवी मुंबईतील धक्कादायक घटना; आरोपी बस चालकाला अटक, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
नवी मुंबई आणि पन...
Continue reading
मराठा आरक्षणावरून शरद पवारांना मंत्री भरत गोगावले यांचा निशाणा; म्हणाले, “पूर्वीच निर्णय घेतला असता तर समाजाला फायदा झाला असता”
पंढरपूर : मराठा आरक्...
Continue reading
डीजे बंदीवर पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची स्पष्ट भूमिका; “संगीताला बंदी नाही, डेसिबल लिमिट पाळा”
“सर्वधर्मीयांच्या उत्सवांसाठी अधिसूचना लागू राहणार”; गणेश मंडळांना सकारात...
Continue reading
Nepal मध्ये ९ दिवसांनंतर चमत्कार! बोगद्यातून कामगारांचा आवाज; ‘आम्ही जिवंत आहोत’ म्हणत दिला प्रतिसाद
अप्पर त्रिशुली-३ए जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात बचावकार्याला वेग; एका कामगारा...
Continue reading
गणपतीच्या आरतीला जाणार का? विद्यानंद बापट यांचे स्पष्ट उत्तर; म्हणाले, “मी नास्तिक आहे...”
Vidyanand Bapat on Ganesh Aarti : ड...
Continue reading
पायऱ्या चढताच लागतोय दम? फिटनेसची कमतरता की आरोग्याच्या समस्येचा संकेत; 'ही' लक्षणे दिसली तर दुर्लक्ष करू नका!
पायऱ्या चढताना किंवा जिना चढल्या...
Continue reading
एक कॉल आला अन् 600 कर्मचाऱ्यांची नोकरी गेली? PayPal च्या भारतातील नोकरकपातीने खळबळ; कंपनी म्हणते 220 कर्मचारी प्रभावित
डिजिटल पेमेंट क्षेत्रातील आघाडीची कंपनी
Continue reading
५ हजारांची मासिक बचत तुम्हाला बनवू शकते लखपती; SIP की RD? जाणून घ्या कोणता पर्याय फायदेशीर
SIP की RD : भविष्यासाठी मोठी बचत करण्यासाठी नेहमीच मोठी ...
Continue reading
DJ बंदीवरून संजय राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, “धोरणात्मक निर्णय घेण्याची हिंमत आहे का?”
DJ आणि लेझरवरील बंदीच्या मुद्द्यावरून राज्यातील...
Continue reading
EPF vs NPS: महिन्याला ₹10,000 गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर कुठे मिळणार जास्त पैसा? जाणून घ्या संपूर्ण गणित
EPF vs NPS : निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्य...
Continue reading
पाकिस्तानमध्ये मोठा दुहेरी हल्ला; २५ सैनिक ठार झाल्याचा BLAचा दावा, हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली
बलुचिस्तानमध्ये जियारत क्रॉस आणि सुराब येथे हल्ले; पाकिस्तानी सुरक्षा दलांची शस्...
Continue reading
कारवाई करत गावात व्यापक आरोग्य तपासणी व सर्वेक्षण मोहीम राबवली आहे.
गावातील २८६ घरांमध्ये सुमारे १,२०६ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून,
त्यामध्ये एका व्यक्तीमध्ये कॉलराची पुष्टी झाली आहे.
त्याचबरोबर इतर तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या
प्रमुख डॉ. रूपाली पवार व त्यांच्या पथकाने गावातील १,०८६ घरांचे सर्वेक्षण करून तब्बल ४,९९२ ग्रामस्थांची तपासणी केली.
सुदैवाने या तपासणीत कोणताही नवीन कॉलराचा रुग्ण आढळून आलेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.
गावात शुद्ध पाणी पुरवठा व जनजागृती मोहीम सुरू
कॉलराचा संसर्ग पाण्याद्वारे पसरतो, याची जाणीव ठेवून गावात वैद्यकीय दृष्ट्या शुद्ध केलेले
पाणी वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
तसेच, स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
डॉक्टरांकडून दिलासा
डॉ. पवार यांनी सांगितले की, “उपचार सुरू असलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे आणि
गावात नवीन कोणताही कॉलराचा रुग्ण आढळलेला नाही.
सध्या गावात कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा धोका नाही.“
ग्रामस्थ अजय प्रधान यांनी आरोग्य विभागाच्या तत्परतेचे कौतुक करत सांगितले,
“आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळेवर आणि योग्य ती काळजी घेतल्यामुळे कॉलराचा फैलाव थांबवता आला आहे.“