मुंबई बोरिवली मधुर एक धक्कादायक घटना समोर आली.
प्रवाशांना वापरल्या जात असलेल्या लेन मध्ये अडचण आणल्याच्या वादावरून एका
पुरुषाने महिलेच्या घराला आग लावल्या ची घटना घडली आहे.
Related News
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अकोटात सद्भावना आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
अशी माहिती तेथील स्थानिक पोलिस अधिकारी यांनी दिली आहे.
बुधवारी बोरिवली पश्चिमेतील गोराई परिसरामधील भीमनगर लेन क्र.5 मध्ये ही घटना घडली आहे.
बोरिवली: 31 मार्चच्या रात्री गल्लीमध्ये खुर्ची टाकून वाटसरूंना अडवणाऱ्या विशाल उधमले आणि
लक्ष्मी बोंटला यांच्यात वाद झाला.
लक्ष्मीने त्याला बाजूला होण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वाद उफाळला.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या विशालने 1 एप्रिलच्या पहाटे 2.30 वाजता
लक्ष्मी यांच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावली. सुदैवाने त्या वेळी लक्ष्मी घरात नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
सीसीटीव्ही मध्ये कैद झाला संपूर्ण प्रकार
सीसीटीव्ही फुटेजमध्ये विशाल घर पेटवतानाचा संपूर्ण प्रकार कैद झाला असून,
त्याने परिसरातील रहिवाशांना पोलिसात तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,
अशी धमकीही दिली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी लक्ष्मी यांच्या तक्रारीवरून बीएनएस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत
गुन्हा दाखल करून विशालला अटक केली. प्राथमिक चौकशीत
सासरच्या घरी अपमानित झाल्याच्या रागातून त्याने हे
कृत्य केल्याचे समोर आले आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे.