अमरावती: आज (29 मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास अशोक वाटिका चौक
परिसरातील उड्डाणपुलावर कालीपिली महिंद्रा मॅक्स वाहनाने (MH 30 P 5686)
समोरून येणाऱ्या किया चारचाकी (MH 27 DE 4651) गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली.
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघात कसा घडला?
टॉवरच्या दिशेने निघालेल्या कालीपिली वाहनाचा चालक गाडीवरील नियंत्रण गमावून
उड्डाणपुलावरील डिव्हायडरला धडकला आणि समोरून येणाऱ्या किया कारवर जाऊन आदळला.
अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करून दोन्ही चालकांना वाहनांसह पुढील तपासासाठी नेले आहे.
उड्डाणपुलावरील वाढते अपघात – नागरिकांमध्ये संताप
सदर उड्डाणपूल शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात आला असला तरी,
पुलाच्या उद्घाटनापासून अनेक अपघात घडले आहेत. काही वाहतूक चालक नो
एन्ट्री झोनमधून सर्रास वाहतूक करत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होते.
वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सेल्फी आणि रीलमुळे वाहतुकीला अडथळा
या उड्डाणपुलावर अनेक नागरिक सेल्फी काढणे आणि सोशल मीडियासाठी रील बनवणे
याकडे आकर्षित होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
यामुळेच या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांची मागणी – कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा
या पुलावर आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आणखी किती बळी
गेल्यावर प्रशासन उपाययोजना करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या पुलावर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी जोरदार मागणी होत आहे.