पातुर तालुक्यातील देऊळगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ – लाखोंचा ऐवज लंपास

पातुर तालुक्यातील देऊळगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ – लाखोंचा ऐवज लंपास

चार ते पाच घरे फोडून रोकड आणि दागिन्यांची चोरी 

पातुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पातुर (प्रतिनिधी): पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम देऊळगाव येथे 25 मार्चच्या

Related News

रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ते पाच घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास

केल्याची घटना घडली आहे. या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 चोरीचा सविस्तर घटनाक्रम:

चोरट्यांनी पत्रकार गोपाल बदरके आणि त्यांचे भाऊ संदीप बदरके यांच्या घरात प्रवेश

करून 1.58 लाख रुपये रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 4.33 लाखांचा ऐवज चोरून नेला.

बदरके यांनी शेत विहीर बांधकामासाठी बँकेतून मोठी रक्कम काढली होती, जी कपाटात ठेवली होती.

त्यांच्या घरातील दरवाज्याला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी आत प्रवेश मिळवला.

तसेच, राजेंद्र बळकार, मनोहर कराळे, कैलास राठोड आणि शंकर गोळे यांच्या घरांवरही

चोरट्यांनी डल्ला मारला.

काही घरांतून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने लंपास करण्यात आले, तर काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला.

 पातुर पोलिसांवर नागरिकांचा रोष:

या घटनेनंतर गावकऱ्यांनी पातुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

👉 गावातील सुरक्षितता धोक्यात आली असून पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

👉 पातुर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे 50-60 कर्मचारी असले तरी

       रात्री गस्त कमी असल्याने चोरटे फायदा घेत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

 गुन्हा दाखल:

या प्रकरणी गोपाल बदरके यांनी पातुर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली असून अज्ञात

चोरट्यांविरुद्ध IPC कलम 331, 4, 305 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Related News