विवरा, पातुर: अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा ‘
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती शारदाताई पवार उत्कृष्ट महिला पुरस्कार’
पातुर तालुक्यातील ग्राम विवरा येथील प्रगतिशील महिला
Related News
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप
ध्रुव राठी महिन्याला 60 लाख कमावतो? 58 कोटींच्या संपत्तीच्या दाव्यामागचं सत्य!
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून राहुल गांधी आक्रमक; मोदी सरकारला म्हणाले, “आम्हाला हेच हवंय!”
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार? नायरा नंतर सरकारी कंपन्यांच्या निर्णयाकडे लक्ष
दांडुके चालवा, बंदुका रोखा; आम्ही जाणारच! संजय राऊतांचा सरकारला इशारा
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश विमान अचानक 28 हजार फूट खाली, मोठी खळबळ
SIR वर फडणवीसांचा मोठा खुलासा; 9.78 कोटींवरून 7.71 कोटी मतदारांची नोंद
10ऑक्टोबरला दिल्ली धडकणार CJP; जंतरमंतरसाठी ‘प्लान बी’ रेडी
फ्लायदुबई प्रकरणात मोठा खुलासा; ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती समोर
Green Teaने वाढवा त्वचेचा ग्लो; जाणून घ्या वापरण्याच्या 6 सोप्या पद्धती
17 हजार फुटांवर विमानाची घसरण; मुंबईच्या पायलटने धैर्याने उधळला मोठा कट
SIR वर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; वगळलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा यादीत येणार
शेतकरी वंदना धोत्रे आणि देविदास धोत्रे यांना प्रदान करण्यात आला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान
हा पुरस्कार केंद्रीय दळणवळण व रस्ते परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते
22 मार्च रोजी अमरावती येथे प्रदान करण्यात आला. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे
अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष गजानन फुंडकर, खासदार बलवंत वानखडे,
खासदार अनिल बोंडे आणि आमदार सुलभाताई खोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
अमरावतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
अनेक कृषी पुरस्कारांनी सन्मानित
गेल्या 30 वर्षांपासून शेती क्षेत्रात काम करणाऱ्या वंदनाताई धोत्रे यांनी 2014 पासून
बायोडायनामिक पद्धतीने रसायनमुक्त शेतीचा अवलंब केला.
त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना राज्यस्तरीय राजीव गांधी पुरस्कार, राज्यस्तरीय कृषी प्रेरणा पुरस्कार,
रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार, कृषी महिला पुरस्कार आणि कृषी विज्ञान केंद्र पुरस्कारासह अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
महिला शेतकऱ्यांचा हा यशस्वी प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

