पातुर: तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खनिज चोरीला आळा
घालण्यासाठी महसूल विभागाने धडक कारवाई करत चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
बाळापूर उपविभागीय अधिकारी बक्षी साहेब आणि पातुर तहसीलदार
Related News
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेसचा थेट बाहेर पडण्याचा प्रस्ताव
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णींचा दमदार अभिनय; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते मन
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे 5 गंभीर आरोप; ‘दोषी आहे म्हणून धमक्या देतो’ म्हणत सोमी अलीचा खळबळजनक हल्लाबोल
नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, 6 अग्निशमन गाड्यांची धाव; रहिवाशांमध्ये प्रचंड भीती
शेअर बाजाराची दमदार पुनरागमन; सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी
Soy Milk बद्दलच्या 5 आश्चर्यकारक गोष्टी; जाणून घ्या त्याचा रंजक इतिहास
डॉ. राहुल वानखडे यांनी खनिज चोरी रोखण्यासाठी विशेष पथक तयार केले होते.
२४ मार्च रोजी रात्री गस्त घालताना बेलुरा रोडवर महामार्गावर मोठ्या प्रमाणात
अवैध गौण खनिज उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले.
महसूल पथकाने धाडसाने कारवाई करत मुरुमाने भरलेले चार ट्रॅक्टर जप्त केले.
कारवाईमध्ये महसूल अधिकाऱ्यांचा सक्रीय सहभाग
या कारवाईत पातुर तहसीलच्या मंडळ अधिकारी श्रीमती सेफाली देशमुख,
तलाठी डी. के. देशमुख, तलाठी मिलके, अमित सबनिस, तलाठी गवई तसेच तलाठी डाबेराव,
तलाठी नाईक, विनोद बोचरे आणि चालक मुजाहिद खान युसुफ खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
रात्रीच्या वेळी झालेल्या या कारवाईमुळे खनिज माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
महसूल विभागाच्या या धडक कारवाईचे परिसरात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.

