Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आता अटकपूर्व
जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
Prashant Koratkar : इतिहासकार इंद्रजित सामंत यांना शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी
Related News
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याचा अंतरिम जामीन
अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयाने हा निर्णय देत जामीन अर्ज फेटाळला आहे.
या निर्णयामुळे आता कोरटकर याच्या अडचणी वाढल्या आहेत.
अंतरिम जामिनाचा अर्जच फेटाळण्यात आल्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तर दुसरीकडे. अटकपूर्व जामिनासाठी प्रशांत कोरटकरने मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) खंडपीठात अर्ज
करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रशांत कोरटकर हा गेल्या 25 फेब्रुवारी पासून फरार असून अटकपूर्व
जमीन मंजूर असतांना देखील प्रशांत कोरटकर आपली बाजू मांडायला व आवाजाचे नमुने द्यायला पोलिसांपुढे पुढे आला
नाही हे विशेष आहे. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप प्रशांत कोरटकरवर आहे.
कोरटकरला कुठल्याही क्षणी अटक होणार?
या प्रकरणी कोल्हापूर नागपूरमध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल झाला आहे. अशातच आता अटकपूर्व जामीन रद्द
झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांचे दोन पथक प्रशांत कोरटकरच्या मागावर आहे. कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे.
मात्र अटकपूर्व जामीन फेटाळला शिवाय सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली असली तरी सुद्धा प्रशांत कोरटकर
पोलिसांना शरण आलेला नसल्याने अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान त्याचा शोध घेण्यासतही पोलिसांच्या हालचाली
सुरू करण्यात आल्या आहे. मात्र यावेळी तरी पोलिसांना प्रशांत कोरटकरचा माघमुस लागतो का हे पहावं लागणार आहे.