क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.
यादरम्यान धनश्रीचा एक व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मी आता खूप भावूक झाले आहे, असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.डान्सर, कोरिओग्राफर आणि इन्फ्लुएन्सर
Related News
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाशिममध्ये नेमकं काय म्हणाले?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
Continue reading
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-अजितदादा निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा गंभीर आरोप, महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करण्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून देश...
Continue reading
सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता; केंद्र सरकारकडून आयात शुल्कात मोठी कपात
कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्के; कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल...
Continue reading
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित घट; पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बुधवारी झालेल्या...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? फॉर्म-६च्या वादावर संजय राऊत आक्रमक; महाभियोग आणण्याची घोषणा निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेद आणि मतदार यादीच्या व...
Continue reading
Rohit Pawar चा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ‘भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बॉम्बही पिकवायला लागला का?’
दुष्काळी पाहणी दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवरून Rohit Pawarची टीका; शेतकऱ्यांना ...
Continue reading
Raj Thackeray निवडणूक आयोगावर आक्रमक; ‘१४ आक्षेपांनंतरही निर्णय झाले, मग कर्ताकरविता कोण?’
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तीन दिवसांत दुष्काळाची अधिसूचना; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली ...
Continue reading
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नबाबत मोठे संकेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल ...
Continue reading
रस्त्याच्या कडेला दिसणारी ‘तोदरी’ नेमकी काय? आयुर्वेदात बिया, पाने आणि फुलांचा पारंपरिक वापर; जाणून घ्या उपयोग
रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत उगवणाऱ्या अन...
Continue reading
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल
तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर
मह...
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून छाननी; 764.7 कोटींच्या सरकारी कामांवरील आरोपांचीही तपासणीमराठा आरक्षणाच...
Continue reading
धनश्री वर्मा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. क्रिकेटर पती युजवेंद्र चहलसोबत तिच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत.
गेल्या काही काळापासून हे दोघं वेगवेगळे राहत असल्याचंही म्हटलं जात आहे. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान
धनश्रीला नुकतंच एका चित्रपटाच्या प्रीमिअरला पाहिलं गेलं. अभिनेता अभिषेक बच्चनच्या ‘बी हॅपी’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला ती पोहोचली होती.
यावेळी तिने पापाराझींसोबत गप्पासुद्धा मारल्या. या गप्पांदरम्यान धनश्रीने सांगितलं की ती अत्यंत भावूक झाली आहे.
अभिषेक बच्चनच्या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. “मी फार भावूक झाले आहे आता. हा चित्रपट खूपच चांगला आहे”,
असं ती म्हणाली. ‘बी हॅपी’ या चित्रपटाची कथा बापलेकाच्या नात्यावर आधारित आहे.
या चित्रपटाची कथा खूपच भावूक असल्याचं धनश्रीने म्हटलंय.
धनश्रीच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करण्यास सुरुवात केली.
धनश्रीच्या प्रतिक्रियेचा संदर्भ काहींनी युजवेंद्रच्या घटस्फोटाशी लावला.
‘जेव्हा चहलपासून विभक्त झाली, तेव्हा भावूक झाली नव्हती का’, असा सवाल एका नेटकऱ्याने केला.
तर ‘चहलकडून 60 कोटी रुपयांची पोटगी घेऊन आता भावूक झाली आहे’, असा टोला दुसऱ्या युजरने लगावला आहे.
युजवेंद्र चहलसोबत धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अशी अफवा होती की तिने 60 कोटी रुपये पोटगीची मागणी केली.
मात्र या अफवा खोट्या असल्याचं धनश्रीच्या कुटुंबीयांकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
“पोटगीबाबत पसरवल्या जाणाऱ्या तथ्यहीन वृत्तांबद्दल आम्हाला खूप राग आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की
धनश्रीकडून अशी कोणतीही रक्कम मागितली गेली नाही. या चर्चांमध्ये काहीच सत्य नाही”, असं त्यांनी म्हटलं होतं.
धनश्री आणि युजवेंद्र यांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. घटस्फोटाची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती
धनश्रीच्या वकिलांनी दिली. त्याचप्रमाणे घटस्फोटाबाबत कोणतंही वृत्त जाहीर करण्यासाठी तथ्य तपासून पाहण्याची विनंती
तिच्या वकिलांनी केली. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार कोर्टातील
सुनावणीदरम्यान धनश्री आणि युजवेंद्रने स्पष्ट केलंय की ते गेल्या 18 महिन्यांपासून वेगळे राहत आहेत.
Read more news here: https://ajinkyabharat.com/vidarbhas-kadaka-akol-is-a-temperature-of-713-akshanwar/