अजित पवारांच्या गटात, शिंदे गटात हे जे प्रवेश सुरू आहेत ते सरळसरळ भीतीपोटी प्रवेश झाले आहेत.
स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची लोकं यांनी भीतीपोटीच पक्षांतर केलं.
अजित पवारांनीही किंवा आमच्या पक्षातून जे लोकं भाजपमध्ये गेले, त्यांनीही भीतीपोटीच पक्ष सोडला,
Related News
असा आरोप राऊतांनी केला रविंद्र धंगेकर हे सुरूवातील शिवसेनेमध्ये होते, नंतर ते मनसेत गेले,
पुढे काँग्रेसमध्ये गेले आणि काल त्यांनी एकनाथ शिंदे गटात ( शिवसेना) प्रवेश केला.
ते चांगले कार्यकर्ते आहेत. पण त्यांनी सांगितलं की विकासकामं होत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहेत,
म्हणून मी शिंदे गटात चाललो आहे. पण मला एक कळत नाही की शिंदे गटात गेल्यामुळे महाराष्ट्रातली किंवा त्यांच्या
कसबा मतदार संघातील कोणती विकासकामं मार्गी लागणार आहेत ? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
अजित पवारांच्या गटात, शिंदे गटात हे जे प्रवेश सुरू आहेत ते सरळसरळ भीतीपोटी प्रवेश झाले आहेत.
स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची लोकं यांनी भीतीपोटीच पक्षांतर केलं.
अजित पवारांनीही किंवा आमच्या पक्षातून जे लोकं भाजपमध्ये गेले, त्यांनीही भीतीपोटीच पक्ष सोडला.
एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्यांची आर्थिक कोंडी केली जाते, आणि त्यांच्या विरोधात काही प्रकरणं असली
तर दबाव आणला जातो असा आरोप संजय राऊत यांनी केला. रविंद्र वायकरांचंसुद्धा असंच एक प्रकरण होतं.
त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांनी पक्षांतर केल्यावर ताबडतोब 24 तासांच त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले,
आता रविंद्र धंगेकरांसारखा कार्यकर्ता फोडण्यासाठी शासकीय यंत्रणा
कामाला लावण्यात आली, खोटे गुन्हे टाकण्यात आले, असेही ते म्हणाले.
रविंद्र धंगेकर खरोखर का गेले? हे त्यांनी त्यांच्या दैवताला स्मरून खरोखर सांगावं,
असं आव्हान राऊतांनी दिलं. धंगेकरांनी पक्ष सोडावा असं वातावरण तयार करण्यात आलं,
त्यांची कोंडी करण्यात आली, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी भीती दाखवण्यात आली.
त्याच भीतीपोटी, विकासकामं रखडली या सबबीखाली रविंद्र धंगेकर हे शिंदे गटात गेले, असा आरोपही राऊतांनी केला.
पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. सत्तेत आल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय देता येत नसल्याची भूमिका धंगेकर यांनी मांडली .
तर रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी रवींद्र धंगेकर यांचे शिवसेनेत स्वागत केले.
आता तुम्ही शिवसेनेत आला आहात. आता लोकांना कळेल who is dhangekar? असेही शिंदे म्हणाले होते.
Read more news here : https://ajinkyabharat.com/waqfachi-awakened-bjp/