सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यांमध्ये खैर वृक्षांची अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
पुष्पा चित्रपटामुळे कशा पद्धतीने चंदनाची तस्करी होते हे तुम्ही पाहिलं असेल.
त्याच पद्धतीने सह्याद्रीच्या पश्चिम घाटात आढळणाऱ्या खैर या झाडांचा लाकडांची देखील तस्करी मोठ्या प्रमाणात होते.
Related News
याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण आणि वाई तालुक्यांमध्ये खैर वृक्षांची अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
खैर हे संरक्षित यादीतील वृक्ष असून देखील त्याची मोठ्या प्रमाणात तोड होते आहे.
एकीकडे वन विभागाने खैर संवर्धनासाठी विविध नियम लागू केले असतानाही, कोकणातील काही व्यापारी या वृक्षांची
अवैध तोड करून लाकूड कर्नाटक आणि गोवा येथील कारखान्यांना पुरवतात, जिथे ते गुटखा, मावा, पान,
सुपारी कात इत्यादी वस्तूंच्या उत्पादनात वापरले जाते. साताऱ्यातील जावळी तालुक्यात ही वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे.
जावळी वनपरिक्षेत्राधिकार्यांनी यापूर्वी १६ कारवाया केल्या आहेत, तरीदेखील ही वृक्षतोड सुरूच आहे.
ही वृक्षतोड रोखण्यासाठी सातारातील उपवनसंरक्षकांनी मेढा, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यांच्या सीमेवर गस्त पथक वाढवण्याची मोहीम हाती घेतली आहे.
त्याच बरोबर चुकीच्या पद्धतीने जर खैर ची तोड होत असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी दिला आहे.
खैर वृक्ष का महत्वाचा?
खैर वृक्षाचे वैज्ञानिक नाव Senegalia catechu असे आहे. खैर वृक्ष प्रामुख्याने सह्याद्रीच्या डोंगर उताराला असणाऱ्या जमिनीवर आढळतात.
खैराचे लाकूड कठीण, टिकाऊ आणि वाळवीरोधक असते. त्यामुळे त्याचा वापर घरबांधणी, शेतीची अवजारे आणि इतर बांधकामांमध्ये होतो.
खैराच्या लाकडापासून कात (कत्था) तयार केला जातो, त्याच बरोबर गुटखा, पान मसाला बनविण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो.
फक्त 250 ते 300 रूपयात व्यापारी शेतकऱ्याचा शेतजमिनीतील ही झाडे विकत घेतात
अल्प दरात कोकणातील व्यापारी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गायरान जमिनीत असणारी ही झाडे तोडून त्याचे रॅकेट चालवत आहेत.
पण अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडते आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होतो.
त्यामुळे, वन विभागाने कठोर पावले उचलून आणि स्थानिक जनतेच्या सहकार्याने या वृक्षतोडीला आळा घालणे आवश्यक आहे.
