‘बीड प्रकरण पंकजा मुंडेंच्या गळ्याशी’…अंजली दमानिया यांनी तोफ डागली, अजून काय केला आरोप?

‘बीड प्रकरण पंकजा मुंडेंच्या गळ्याशी’…अंजली दमानिया यांनी तोफ डागली, अजून काय केला आरोप?

Anjali Damania criticized Pankaja Munde : बीड प्रकरण हे पंकजा मुंडे यांच्या गळ्याशी आल्याचा खणखणीत

टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पंकजा ताईंवर टीका केली आहे.

Related News

पंकजा मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात अथवा बीड विषयात प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांनाच पंकजाताई यांनी यापूर्वी सुनावले होते.

पुण्यात आले तर पुण्याचे प्रश्न विचारा, अस दम देताना पंकजा मुंडे दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे आमदार सुरेश धस

यांनी त्यांना टोला लगावला होता. तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पंकजा ताईंवर टीका केली आहे.

पंकजा मुंडेंचा आजकाल वादग्रस्त वक्तव्य करण्याचा सपाटा सुरु आहे, अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे.

‘बीडचे प्रकरण त्यांच्या गळ्याशी’

‘पंकजा मुंडे या महिला बाबत कधीच लढलेल्या दिसल्या नाहीत, फक्त टिपणी करताना दिसतात.

हुंडाबळी बाबत त्या बोलतात, तर त्या स्वत: का लढत नाहीत? आम्ही सर्व महिला म्हणून त्यांना पाठिंबा देऊ.

पण आता बीडचे प्रकरण त्यांच्या गळ्याशी येतंय आणि ते डायव्हर्ड करण्यासाठी त्या आता अशा बोलतात’,

अशी घणाघाती टीका अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे.

याधीश सुद्धा पुरूषी मानसिकतेचे

एका व्यक्तीने फॅमिली कोर्टातील न्यायाधीश च्या वक्तव्याचे फेसबुक पोस्ट केली आहे. घटस्फोट झालेली महिला फॅमिली कोर्टात गेलेली आहे

आणि मध्यस्थी करणाऱ्या न्यायाधीशाने केलेली टिप्पणी आज महिला दिना निमित्त महत्वाची आहे,

याकडे दमानिया यांनी लक्ष वेधले. जज असे म्हणतो, तू टिकली लावत नाही, मंगळसूत्र लावत नाहीस तर नवरा तुझ्यात रस कसा घेईल,

हे ऐकून मी शॉक आहे. ही पुरुषप्रधान संस्कृतीचे असे जज असतात,

त्यामुळे अशा जजला फॅमिली कोर्टातून तात्काळ बदली करावी.

करण ते महिलांना न्याय देऊच शकत नाहीत, असे मत दमानिया यांनी मांडले.

सतीश भोसले हा विकृत माणूस

सतीश भोसले हा अतिशय विकृत माणूस आहे. त्याने एकाला बॅटने मारले,

हरण पकडत असताना एकाने विरोध केला म्हणून एकाचे दात तोडले, यावरून याची विकृती दिसते.

हा पैसे उधळतो, हेलिकॉप्टरमधून उतरतो, सोनं घालताना दिसतो, अशा माणसा सोबत सुरेश धस एकत्र बसतात,

हा गुन्हेगार आहे. त्यामुळे सुरेश धसाने आता पत्रकार परिषद घेऊन, त्यांची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहेत,

स‍तीश भोसले हा एवढा पैसा आला कुठून, हे कार्यकर्ते राजकारणाच्या कार्यकर्त्यांना पोलीसांचे संरक्षण मिळतं,

यातून हे घडतं, त्यामुळे युवा पिढी भरकटत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला.

सुरेश धस यांनी त्यांची भूमिका लवकर स्पष्ट करावी अन्यथा

त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

Read more news here : https://ajinkyabharat.com/mlc-potanividnuk-nationalist-russian-sangram-kot-vs-jhishan-siddiqui-kunchan-pardan-jad/

 

Related News