चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे.
भारताचा अंतिम फेरीत सामना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे.
दुसरीकडे, हा सामना कर्णधार रोहित शर्माच्या कारकिर्दीचा शेवट असेल, अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे.
यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने आपलं मत मांडलं आहे.
टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खरं तर २६५ धावांचं खडतर आव्हान होतं.
पण हे आव्हान भारताने सहज गाठलं. आता भारत अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी लढा करणार आहे.
हा सामना ९ मार्चला होणार आहे. पण ९ मार्च रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीचा शेवटचा सामना असेल का?
अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. रोहित शर्माचं वय आणि पुढील रणनिती पाहता बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.
कारण भारतीय संघ २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. तिथपर्यंत रोहित शर्माची वनडे जागा राहील की नाही?
याबाबतही शंका आहे. या सर्व प्रश्नांबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला प्रश्न विचारण्यात आला.
दुबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला विचारलं गेलं की, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्माचा प्लान काय आहे? त्याच्यात अजून किती क्रिकेट बाकी आहे?
प्रश्नांचा भडिमार सुरु झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, ‘आता तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना समोर आहे.
आता मी याबाबत काय बोलू?
पण एक गोष्ट सांगू इच्छितो की, जर कर्णधार याच पद्धतीने फलंदाजी करत असेल
तर तो ड्रेसिंग रुमसाठी मेसेज आहे. त्याच्यात अजून क्रिकेट बाकी आहे. रोहितने मोठी खेळी केली नाही पण चांगली खेळी केली आहे.
आम्ही त्याच प्रभावाने खेळाडूंचं मूल्यमापन करतो.’
गौतम गंभीरने पुढे सांगितलं की, तज्ज्ञ आणि पत्रकार धावा आणि सरासरी बघतात.
पण आम्ही त्या खेळाडूने सामन्यात कशी छाप सोडली हे पाहतो. जर सर्व काही व्यवस्थित आहे तर त्याने काही फरक पडत नाही.
आपण ज्या प्रकारचे क्रिकेट खेळू इच्छितो त्यासाठी जर कर्णधार पहिला हात वर करत असेल तर त्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.
दुसरीकडे, बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे फॉर्मेटसाठी वेगळा विचार करत आहे. २०२७ वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी नव्या कर्णधाराच्या शोधात आहे.
त्यामुळे चॅम्पियन्स
ट्रॉफी ही रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीचा शेवटचा सामना असू शकतो.
आता रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदानंतर निवृत्ती घेतो की पुढे खेळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
या स्पर्धेनंतर टीम इंडिया थेट इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका जूनमध्ये होणार आहे.
या मालिकेपूर्वी संघात काय उलथापालथ होते याकडे लक्ष लागून आहे.