आरोपींना भर चौकात…धनंजय देशमुख यांच्या वेदना, तुमचे पण काळजी पिळवटणार, केली मोठी मागणी

आरोपींना भर चौकात…धनंजय देशमुख यांच्या वेदना, तुमचे पण काळजी पिळवटणार, केली मोठी मागणी

Dhananjay Deshmukh Big Statements : दोन दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येवेळीचे फोटो समाज माध्यमांवर फिरत आहेत.

त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तर आता धनंजय देशमुख यांनी एक मोठी मागणी केली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येवेळीचे छायाचित्र समाज माध्यमांवर फिरत आहेत.

Related News

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

तर आता याप्रकरणी धनंजय देशमुख यांच्या वेदना पुन्हा समोर आल्या आहेत. त्यांनी गंभीर आरोप करत एक मोठी मागणी केली आहे.

आरोपींना भर चौकात सोडा…

खून प्रकरणातील आरोपी खंडणी मागतात, चोऱ्या करतात. हे पूर्वीपासूनच गुन्हेगार आहेत हे आम्हाला माहीत होतं.

संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने आरोपींनी मारलं ते सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे.

मी त्यांचा रक्ताचा भाऊ आहे मला तर वेदना होणं साहजिक आहे, असे धनंजय देशमुख यांनी मन मोकळं केलं.

संतोष देशमुख यांचे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्राला वेदना झाल्या आहेत.

आरोपींना भरत चौकात सोडलं पाहिजे. त्यांना जात धर्म काहीच नाही, समाज त्यांना शिक्षा देईल, असे मोठे वक्तव्य देशमुखांनी केलं आहे.

कुणाच्या सांगण्यावरून केला खून?

खून प्रकरणातील आरोपींनी हे कृत्य कोणाच्या तरी सांगण्यावरून केला, यांना अशाप्रकारे हत्या करण्याचे ट्रेनिंग कोणी दिलं,

असा मोठा सवाल धनंजय देशमुख यांनी विचारला आहे. यापूर्वी देखील त्यांनी असे कृत्य केले आहेत. मात्र निराधार लोकांनी आवाज उठवला नाही.

आरोपींनी अनेकांचे संसार उध्वस्त केले. अनेक लेकरांना अनाथ केलं आहे, कोणाचा आधार नसल्याने अनेक लोकांनी न्याय मागितला नाही, असे ते म्हणाले.

आरोपींना वेगळी शिक्षा झाली पाहिजे. आतापर्यंत आम्ही न्याय मागत होतो. मात्र शासनाने यांना कठोरात कठोर शिक्षा कशी देता येईल यावर विचार करावा.

आरोपी सैतान आहेत माणूस मेल्यानंतर ही त्यांनी मृतदेहाची विटंबना केली. एक नंबरचा आरोपी जो आहे

तो शपथपत्रात सांगतो की हे सगळं माझं आहे याची नैतिक जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी, असे सूचक विधानही देशमुख यांनी केले आहे.

न्याय द्या, पोलीस यंत्रणा त्यांच्या खिशात

खून प्रकरण हा विषय आमच्या कुटुंबा पुरता नाही तर संपूर्ण गावकऱ्यांचा आणि समाजाचा आहे

या प्रकरणात लोक जो निर्णय घेतील त्यामध्ये मी सहभागी असेल. फरार आरोपीचा तपास यंत्रणा घेत आहे.

सध्या अनेक ठिकाणी आंदोलन आणि बंद पुकारण्यात येत आहेत ते जनतेने संवेदनशील पणे करावेत

आम्हाला न्याय पाहिजे, सर्व पोलीस यंत्रणा यांच्या खिशामध्ये आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला.

आरोपी परत परत चुका करत होते ते सैतानी प्रवृत्तीचे आहेत, खुनाची घटना घडल्यानंतर देखील यांनी

अनेक प्लॅन केले आहेत त्याची देखील वेगळी टिप्पणी आम्ही तयार केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Read more here : 

https://ajinkyabharat.com/bhujbalancharya-minister-motha-adatha-anjali-damania-yancha-theate-corte-janyacha-gesture-due-to-kay/

Related News