धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अडीच महिन्यांतच महायुतीच्या एका नेत्याला राजीनामा द्यावा लागला.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते,
मंत्री धनंजय मुंडे यांना काल राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड आहे.
तो धनंजय देशमुख यांचा निकटवर्तीय असल्यानेच मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र याच मुद्यावरून आता अंजली दमानिया यांनी तोफ डागली आहे. एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार
झाला, त्यावेळी छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता.
त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच वेळी छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती.
मात्र आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याने त्यांच्या जागी भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकतं.
याच मुद्यावरून अंजली दमानियांनी रोखठोक भूमिका मांडली.
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
एक घाण गेली, दुसरी घाण येते हे दुर्दैवी आहे. ज्यांनी महाराष्ट्र सदनचा घोटाळा केला त्यांना मंत्रीपद कसं देऊ शकतात
असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर, जर छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं तर कोर्टात
जाऊन त्यांची बेल रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही दमानियांनी सांगितलं.
त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रीपद मिळण्याच्या वाटेत मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यताही आहे.
गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे
जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे असं अंजली दमानिया म्हणाल्या.
पीडित महिलेसोबत आपण स्वतः राज्यपालांकडे जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
विकृत व्यक्तींना मंत्रीमंडळात स्थान देऊ नका असी भूमिकाही दमानियांनी घेतली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात अंजली दमानिया अतिशय आक्रमर झाल्याचं पहायला मिळत आहे.
असा मंत्री जर मंत्रिमंडळात बसत असेल तर त्याला तिथून दूर करणे हे सरकारचं कर्तव्य आहे आणि अशा लोकांना
मंत्रिपदाची देण्याची काय गरज? चांगली लोकं सरकारला मिळत नाहीत का?
म्हणजे चांगली लोकं महाराष्ट्रात नाहीत का? का असे शोधून शोधून एक एक नग त्या मंत्रिमंडळात भरलेत मला तोच प्रश्न पडतोय असा सवालही अंजली दमानिया यांनी केला.
Read more here:
https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yancha-rajinamyacha-developed-chief-minister/