उशिराचे मोठे परिणाम : अकोल्यात ५० विद्यार्थी (TET) परीक्षेला मुकले

(TET)

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आज राज्यभरात होत असताना अकोला जिल्ह्यात एक गंभीर प्रकार समोर आला आहे. खंडेलवाल ज्ञानमंदिर शाळा या परीक्षा केंद्रावर दहा मिनिटे उशिर झाल्याच्या कारणावरून तब्बल ५० विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

परीक्षेसाठी अधिकृत वेळ सकाळी १०.३० वाजता निश्चित होती; तर केंद्रावर उपस्थित राहण्याची अंतिम वेळ १०.०० वाजता होती. शहरातील अनेक केंद्रांवरील वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांची गर्दी आणि तपासणीतील विलंबामुळे काही विद्यार्थी पाच ते दहा मिनिटांनी केंद्रावर पोहोचले. त्यांनी केंद्रावरील शिक्षक आणि अधिकाऱ्यांना विनंती करूनही त्यांना परीक्षेला प्रवेश देण्यात आला नाही.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार—“केवळ काही मिनिटांच्या उशिरामुळे आमचं वर्ष वाया जाणार आहे. आम्ही विनंती केली, परंतु अधिकार्‍यांनी नियमांचे कारण सांगत प्रवेशच दिला नाही.”

Related News

स्थानिक पालक आणि समाजातील काही कार्यकर्त्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की—‘कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे.’अशा लहानशा कारणावरून ५० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणे अमानवीय आहे.’या घटनेनंतर प्रश्न उपस्थित झाला आहे की या विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढणार कोण?
त्यांनी फॉर्म फी भरली, तयारी केली, प्रवास केला… तरी दहा मिनिटांच्या उशिरामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.

दुसरीकडे,विद्यार्थी वेळेच्या नियमाचे पालन न केल्याने त्यांना प्रवेश देता आला नाही, असे स्पष्टीकरण शाळा प्रशासनाने दिले आहे. वेळेच्या मुद्द्यावर शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला. परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांना पाचारण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, किंवा यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडे केली आहे.या प्रकरणामुळे परीक्षा व्यवस्थापन आणि नियमांच्या कठोर अंमलबजावणीवरही मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलं असून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

टीईटीचे नियम आणि reporting time काय आहेत:

  1. परीक्षेची वेळ:

    • पेपर 1 — सकाळी 10:30 ते 1:00 होते.

    • पेपर 2 — दुपारी 2:30 ते 5:00 आहे.

  2. Reporting Time:

    • उमेदवारांनी परीक्षेच्या सुरू होण्यापूर्वी किमान 30 मिनिटे आधी केंद्रावर पोहोचणे सुचवले आहे.

    • काही स्त्रोतांमध्ये सांगितले आहे की अधिक वेळ (30 ते 90 मिनिटे आधी) येणे योग्य आहे, कारण केंद्रावर तपासणी, प्रवेश प्रक्रिया, ओळख तपासणी वगैरे होतात.

    • हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशपत्र (Admit Card) आणि वैध आयडी पुरावा (जसे Aadhar, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आवश्यक आहे.

    • काही परीक्षा नियमांमध्ये “दर्जेदार प्रवेश वेळ” (reporting time) नंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

  3. इतर नियम:

    • इलेक्ट्रॉनिक उपकरणे (मोबाईल फोन, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर इ.) परीक्षेच्या हॉलमध्ये आणणे बंद आहे.

    • उमेदवारांनी हॉल टिकेट छापून घेऊन आणि फोटो आयडी प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

    • टीईटी उत्तीर्ण होणे शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक आहे, हे नियमांमध्ये नमूद आहे

read also : https://ajinkyabharat.com/shocking-kamasutra-festival-controversy-govyat-osho-foundations-festival-storm-controversy/

Related News