बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्च्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या मोर्चात सहभागी झालेले आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आता वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः संग्राम जगताप यांनी “26 तारखेला त्यांनी बैल कापला तर 27 तारखेला आम्ही इथे येऊ” असे दिलेले विधान चर्चेचा आणि वादाचा विषय ठरले आहे.
नेकनूरमध्ये पार पडलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना संग्राम जगताप यांनी अत्यंत आक्रमक भाषेत आपली भूमिका मांडली. “शुरूवात वो लोग करते है लेकिन खत्म हम करते है,” असे म्हणत त्यांनी काही घटकांवर गंभीर आरोप केले. तसेच हिंदू समाजाने आता एकत्र राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सभेत बोलताना त्यांनी पुढे म्हटले की, “जनगणना झाली तर यांची संख्या 40 कोटींच्या पुढे जाईल. सहा वर्षांच्या मुलीपर्यंत येण्याची त्यांची हिंमत झाली आहे. ही विचारधारा हिंदुत्ववादी लोकांनी विसरता कामा नये.” त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाल्याचे पाहायला मिळाले.
Related News
कुरणखेडच्या गजानन महाराज विद्यालयाचा कायापालट! माजी विद्यार्थ्यांकडून 10 हून अधिक भौतिक सुविधांचे लोकार्पण
D-Mart Secret: डाळी इतक्या स्वस्त का? 5 मोठी कारणे आली समोर!
‘2 दिवसांत येतो’ म्हणत आईला आश्रमात सोडलं; 4.5 वर्षे वाट पाहून अखेर आईने डोळे मिटले!
नागपुरात 12 शाळांना धमकीचा ई-मेल; पालकांमध्ये खळबळ, पोलिसांचा तगडा बंदोबस्त
चित्रा वाघांचा विजय वडेट्टीवारांवर जोरदार पलटवार; “अक्कल असेल तर न्यायालयाचा निर्णय मान्य करा!”
पंकजा मुंडे रिटायर्ड होणार? अखेर ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला पूर्णविराम; म्हणाल्या, “मी चांगली खमकी आहे!”
भाजपाची ‘मास्टरस्ट्रोक’ टीम जाहीर; स्मृती इराणींचे कमबॅक, अमित मालवीयांची गच्छंती
सेंट विल्फ्रेड कॉलेजच्या कथित गैरप्रकारांवर युवासेना आक्रमक; मुंबई विद्यापीठाकडून तातडीच्या कारवाईचे आश्वासन
आर्णी पत्रकार संघाची नवी दमदार कार्यकारिणी गठीत; आबिद फानन अध्यक्ष, जाकीर सोलंकी सचिव
पुसदमध्ये महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला 4 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; एसीबीची धडक कारवाई
तुकाराम मुंढेंचा दणका! Domino’s नंतर Parle Agro गोदामावर 11 तास धाड; लाखोंचा माल जप्त
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी ; 20 वर्षांत 40 बदल्या!
तसेच पोलिस प्रशासनावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या लोकांनी दगडफेक केली. हे लोक भयभीत करण्याचा प्रयत्न करतात. पण आता या झुरळांना घाबरण्याची गरज नाही,” असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे चित्र आहे.
यावेळी त्यांनी थेट पोलिस प्रशासनालाही इशारा दिला. “पोलीस प्रशासनाला आजच सांगतो, 26 तारखेला बैल कापला गेला तर 27 तारखेला आम्ही इथे येऊ. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घ्यावी,” असे ते म्हणाले. त्याचबरोबर “राजकीय पक्ष काम करत नसतील तरी हिंदू म्हणून आपल्याला काम करावे लागेल,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संघटित राहण्याचे आवाहन केले.
संग्राम जगताप यांनी आर्थिक बहिष्काराचाही मुद्दा उपस्थित केला. “या लोकांशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. हा कायदा आपण स्वतःच करायला हवा,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानावरून आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या मोर्चात सहभागी झालेले भाजप आमदार महेश लांडगे यांनीही जोरदार भाषण केले. “सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न होतो आणि मदत मिळत नाही. सर्वधर्म समभावचा बुडबुडा आता बाहेर काढा,” असे म्हणत त्यांनी सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधला.
“जो कायदे मानणार नाही, त्याच्यासाठी दांडे हातात घ्या,” असे विधान करत त्यांनी कठोर भूमिका घेतली. तसेच “आपल्यात काही पुरोगामी विचारांचे किडे आहेत. पुरोगामी राजकीय नेत्यांना लाज वाटली पाहिजे,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली.
महेश लांडगे यांनी पोलिस प्रशासनालाही थेट इशारा दिला. “पोलिसांनी जर अशा पद्धतीने पक्षपाती भूमिका घेतली आणि न्याय दिला नाही, तर दंगल झाली तर त्याला प्रशासन जबाबदार असेल,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता प्रशासनावर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण संवेदनशील बनले असून, सोशल मीडियावरही या वक्तव्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी या वक्तव्यांचे समर्थन केले आहे, तर अनेकांनी अशा भाषणांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी स्थानिक निवडणुका आणि वाढत चाललेले सामाजिक ध्रुवीकरण याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची आक्रमक वक्तव्ये अधिक चर्चेत येत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवरून वातावरण तापत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, प्रशासनाने अद्याप या वक्तव्यांवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नेकनूर आणि परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
आता या संपूर्ण प्रकरणावर राज्य सरकार, विरोधक आणि सामाजिक संघटना काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, संग्राम जगताप आणि महेश लांडगे यांच्या वक्तव्यांमुळे बीडचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे स्पष्ट झाले आहे.
