तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावाः ग्रामस्थांची मागणी
अकोला तालुक्यातील दहीहंडा हे गाव मोठे असून जिल्ह्याच्या
शेवटच्या टोकाचे गाव आहे. या गावाची लोकसंख्या अंदाजे १२
Related News
केंद्राचा धडाकेबाज निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह, पोटदुखी आणि अँटिबायोटिक औषधांचाही समावेश
नवी दिल्ली : रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्र...
Continue reading
FDA चा मोठा धक्का! उद्घाटनानंतर 48 तासांत कुडाळच्या 'आपला बाजार' मॉलवर धाड; नेमकं काय घडलं ?कुडाळमधील 'आपला बाजार' मॉलचे उद्घाटन प्राजक्ता माळी यांच्या...
Continue reading
CEO टिम कुक यांचा मोठा खुलासा : जर तुम्ही नवीन iPhone किंवा Appleचे इतर कोणतेही उत्पादन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जगातील आघाडीची टेक क...
Continue reading
Shiv Sena UBT Split : धक्कादायक! ठाकरेंच्या शिवसेनेत 6 व्यांदा फूट; 60 वर्षांच्या इतिहासातील 6 मोठ्या बंडाची संपूर्ण कहाणी
महाराष्ट्राच्य...
Continue reading
समाजवादी पक्षात मोठी फूट? ईडी, घोटाळे आणि अमित शहांना पत्रामुळे वाढली राजकीय खळबळ; कॅबिनेट मंत्र्यांचा सनसनाटी दावा
समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार का...
Continue reading
Ladki Bahin Yojana News : अमरावती जिल्ह्यात ई-केवायसी आणि पडताळणीनंतर 33 हजार 304 महिला कायमच्या अपात्र ठरल्या आहेत. बोगस लाभार्थ्यांकडून रक्कम वसू...
Continue reading
भारतीय जहाजांवरील हल्ले थांबवा, भारताचा अमेरिकेला कठोर संदेश
भारताचा अमेरिकेला कठोर संदेश : ओमानच्या आखातात घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर भारत आणि अमेरिका...
Continue reading
इराणसाठी काळरात्र? ट्रम्प यांच्या स्फोटक घोषणेने जगभरात खळबळ; मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा शिगेला
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने पुन्हा ए...
Continue reading
इराण युद्ध, होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट आणि वाढत्या उत्पादनाच्या जोरावर अमेरिकेने अवघ्या 3 महिन्यांत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश ...
Continue reading
नेपाळने भारतीय आंब्यांवर बंदी घातली नाही; केंद्र सरकारचा मोठा खुलासा, अफवांवर पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांमध्ये नेपाळने भारतीय
Continue reading
लंडनमध्ये मराठी कुटुंबाचा गूढ अंत; अदिती परळकर, राकेश पै आणि मुलगा सिड यांचा दुर्दैवी मृत्यू
लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका मराठी कुटुंबाच्या गू...
Continue reading
उन्हाळ्यात वजन कमी करायचे आहे? आहारात समाविष्ट करा सत्तूपासून बनणारे हे 6 पौष्टिक पदार्थ
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्याला पोषक ठरणारे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल अस...
Continue reading
हजाराच्या जवळपास आहे. या गावाला ८४ खेडी योजना अंतर्गत
वारी प्रकल्पातून जीवन प्राधिकरण योजना अंतर्गत पाणीपुरवठा
केल्या जातो. दहीहंडा या गावाला जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत
योजनेशिवाय दुसरे पर्याय नाही. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी दहा
दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.
तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
दहीहंडा हे खारपान पट्टा भागात येत असल्यामुळे गोड पाण्याचे
दुसरे स्रोत नाही. गाववासीयांना योजनेवरच अवलंबून राहावे लागत
आहे. उन्हाळ्यामध्ये गाव वासियांना प्रत्येक भागाला पंधरा
दिवसाआड प्रमाणे पाणीपुरवठा केला जात होता. त्याचप्रमाणे
वस्तुस्थिती पाहून ग्रामस्थ पाणी साठवणूक करीत होते. परंतु आता
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध
आहे. तसेच पाणी बदलल्यामुळे नवीन पाण्यामध्ये तिसऱ्या किंवा
चौथ्या दिवशी चामडोक, जंतू निर्माण होत आहेत. त्यामुळे
पाणीपुरवठा साठवणूक करता येत नाही. साठवलेले पाणी
ग्रामस्थांनी पिण्यासाठी वापर केला तर विविध आजार होण्याची
भीती आहे. जिल्ह्यात विविध प्रकारच्या आजाराचा फैलाव होत
असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. म्हणून जास्त दिवस
साठावणुक केलेले पाणी वापरण्यापासून ग्रामस्थांना भीती निर्माण
झालेली आहे. यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने
धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे मात्र वारी प्रकल्पाद्वारे
जीवन प्राधिकरण मार्फत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दहीहंडा या
गावाला सद्यस्थितीत पूरेसा पाणी पुरवठा केल्या जात नसल्यामुळे
गावात प्रत्येक भागाला दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.
काही महिन्यापासून जलवाहिनीची गती कमी झाल्यामुळे
जलकुंभ भरण्यासाठी सहा तास पेक्षा जास्त लागत आहे. तसेच
योजने द्वारे पाणीपुरवठा कमी होत असल्यामुळे गावात प्रत्येक
भागाला दहा दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/safety-of-high-water-tanks-in-akola-depends-on-rams-trust/