190 कोटींचं मेगा लग्न! 1100 पाहुणे, 9 कोटींचं एका दिवसाचं वेन्यू भाडं; Taylor Swift-Travis Kelce यांच्या शाही विवाहाची जगभरात चर्चा
जगातील सर्वाधिक लोकप्रिय पॉप स्टार Taylor Swift आणि अमेरिकन फुटबॉल स्टार Travis Kelce यांच्या विवाहाची सध्या जगभरात मोठी चर्चा रंगली आहे. संगीतविश्व आणि क्रीडाक्षेत्रातील या दोन सुपरस्टार्सच्या लग्नाची तयारी एखाद्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याप्रमाणे करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या विवाहासाठी तब्बल 190 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जात असून, 1100 हून अधिक मान्यवर पाहुणे, कडेकोट सुरक्षा व्यवस्था, डिजिटल निमंत्रण आणि NDA (Non-Disclosure Agreement) यामुळे हा विवाह जगातील सर्वात चर्चित शाही सोहळ्यांपैकी एक ठरत आहे.
रिपोर्ट्सनुसार, हा भव्य विवाह सोहळा अमेरिकेतील प्रसिद्ध मेडिसन स्क्वेअर गार्डन येथे पार पडणार आहे. संगीत, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असल्याने चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
190 कोटींचं बजेट, जगभरात चर्चा
Taylor Swift लग्नासाठी 10 ते 20 मिलियन डॉलर, म्हणजेच अंदाजे 95 कोटी ते 190 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती विविध रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. इतक्या मोठ्या बजेटमुळे हा विवाह केवळ सेलिब्रिटी वेडिंग न राहता जागतिक स्तरावरील सर्वात आलिशान सोहळ्यांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Related News
Taylor Swift ची एकूण संपत्ती अब्जावधी डॉलरमध्ये असल्याने इतक्या मोठ्या खर्चाकडे तिच्या चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे. लग्नाच्या प्रत्येक गोष्टीत लक्झरी, भव्यता आणि गोपनीयतेला प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले जात आहे.
वेन्यूचं एका दिवसाचं भाडं तब्बल 9 कोटी
Taylor Swiftच्या विवाहासाठी निवडण्यात आलेले मेडिसन स्क्वेअर गार्डन हे जगातील सर्वात प्रतिष्ठित इव्हेंट स्थळांपैकी एक मानले जाते. रिपोर्ट्सनुसार, या ठिकाणाचे एका दिवसाचे भाडे सुमारे 1 मिलियन डॉलर, म्हणजेच जवळपास 9 कोटी रुपये इतके आहे.
याशिवाय संपूर्ण वेन्यू विवाहासाठी सज्ज करण्यासाठी आणि विशेष सेटअप उभारण्यासाठी आणखी 3 मिलियन डॉलर, म्हणजेच सुमारे 28 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ वेन्यूवरच मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे.
1100 हून अधिक VIP पाहुण्यांची उपस्थिती
या शाही विवाहासाठी 1100 ते 1200 पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संगीत, चित्रपट, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने हा कार्यक्रम जागतिक माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
रिपोर्ट्सनुसार, या विवाहाला एड शीरन, चेरी सीबॉर्न, जो क्राविट्झ, सुकी वॉटरहाउस, बेन्सन बून तसेच हाइम कुटुंबातील सदस्य उपस्थित राहू शकतात. याशिवाय अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि उद्योगविश्वातील मान्यवरही उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोपनीयतेसाठी पाहुण्यांना NDA
या विवाहाची सर्वात चर्चेची बाब म्हणजे गोपनीयतेसाठी करण्यात आलेली विशेष व्यवस्था. पारंपरिक छापील लग्नपत्रिकांऐवजी पाहुण्यांना डिजिटल निमंत्रण पाठवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक निमंत्रणासोबत NDA (Non-Disclosure Agreement) देखील जोडण्यात आल्याचे सांगितले जाते. विवाहाशी संबंधित कोणतीही माहिती, फोटो किंवा व्हिडिओ सार्वजनिक होऊ नयेत, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.
आजच्या सोशल मीडिया युगात कोणतीही माहिती काही क्षणांत व्हायरल होते. त्यामुळे या विवाहातील प्रत्येक गोष्ट गोपनीय ठेवण्यासाठी आयोजकांकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते.
सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर
इतक्या मोठ्या प्रमाणावर जागतिक दर्जाचे सेलिब्रिटी उपस्थित राहणार असल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेलाही सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, हाय-एंड प्रायव्हेट सिक्युरिटी, अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी, विशेष प्रवेश व्यवस्था आणि अत्याधुनिक मॉनिटरिंग सिस्टिमचा वापर केला जाणार आहे. पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा आराखडाही तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मॅनहट्टनमधील वाहतुकीवर परिणाम?
या विवाहामुळे मॅनहट्टन परिसरातील काही रस्ते तात्पुरते बंद ठेवण्याची परवानगी मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कार्यक्रमाच्या काळात परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.
मेडिसन स्क्वेअर गार्डनचे वेळापत्रकही या कार्यक्रमासाठी आधीच ब्लॉक करण्यात आल्याचे विविध रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
विवाह की मेगा म्युझिक शो?
Taylor Swift ही जगातील सर्वात मोठ्या पॉप स्टार्सपैकी एक असल्याने तिच्या विवाहातही संगीताचा खास जलवा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट्सनुसार, या सोहळ्यात विशेष लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स आयोजित केले जाऊ शकतात. काही तांत्रिक टीम सदस्य अमेरिकेतील प्रसिद्ध प्रॉडक्शन कॅम्पसमध्ये दिसल्यामुळे विवाहासाठी भव्य स्टेज आणि विशेष सेट तयार केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
यामुळे हा विवाह पारंपरिक पद्धतीने न होता एका भव्य आंतरराष्ट्रीय म्युझिक इव्हेंटप्रमाणे साजरा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला
Taylor Swift आणि ट्रेविस केल्स यांची जोडी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्यांच्या प्रत्येक सार्वजनिक उपस्थितीवर चाहत्यांचे लक्ष असते. त्यामुळे त्यांच्या विवाहाकडेही संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
