मुंबईतील ज्या स्टुडिओत कुणाल कामरा याचा शो शुट झाला होता तेथे आता पालिकेचे पथक
पोहचले आणि त्यांनी या हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पाडले आहे.
याच हॉटेलातील स्टुडिओत कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक पॅरीडी साँग गायले होते.
Related News
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक व्हीआयपींवर आपल्या पॅरीडी साँगमधून स्टँडअप
कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी टीका केल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
काल रात्रीच अंधेरी एमआयडीसीतील हॉटेल युनी कॉन्टीनेन्टल हॉटेलात जाऊन शिवसैनिकांनी संपूर्ण शोचे सेट तोडून टाकला आहे.
त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणानंतर पालिकेने लागलीच अंधेरीच्या ज्या हॉटेलात हा शो शूट झाला तेथे जाऊन बुलडोजर चालविला आहे.
एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केलेले गाणे कुणाल याने शोच्या शेवटी गायले होते. या शो संदर्भात ट्रेलर शिवसेना नेते
संजय राऊत यांनी शेअर केल्यानंतर तर शिवसैनिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली
आणि रात्री उशीरा शिवसैनिक हॉटेलात पोहचले आणि तोडफोड केली आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने याआधी देखील महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शो केले होते.
कुणाल कामरा यांच्या शोवर त्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना देखील बोलावले होते.
त्यामुळे पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती अंबानी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या शोमध्ये विडंबनात्मक टीका
असल्याने शिवसेना आणि महायुतीचे सर्वच नेते संतप्त झाले आहेत. कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कुणाल कामरा या घटनेनंतर पाँडेचेरी येथे गेला असल्याचे म्हटले जात आहे. या कॉमेडी शो दरम्यान एकनाथ शिंदे यांचा
गद्दार असा उल्लेख करीत पॅरीडी साँग गायले आहेत त्यात त्या गाण्याला
त्याने शाहरुख खानच्या डीडीएलजेच्या ‘भोली सी सुरत’ या गाण्याची चाल लावली आहे.
राजकारणावर भाष्य केले
कॉमेडी शोमध्ये कुणाल कामरा याने महाराष्ट्राच्या राजकारणासह देशातील राजकारणावर भाष्य केले.
या शोच्या अखेरीस त्याने काही पॅरीडी साँग सादर केली होती.त्यात कुछ कुछ होता
है या चित्रपट गीताच्या चालीवर त्याने गद्दार एकनाथ शिंदे असे गाणे सादर केले होते.
त्याआधी कुणाल याने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कशी फोडली आणि पक्ष कसा गिळंकृत केला आणि न्यायालयाने देखील कशी साथ दिली याचा उल्लेख केला.
आधी भाजपातून शिवसेना बाहेर आली. नंतर शिवसेनेतून शिवसेना बाहेर आली.नंतर एनसीपीतून एनसीपी बाहेर आली.
एक व्होटर आणि ९ बटण देण्यात आले. त्यामुळे मतदार कसे कन्फ्युज झाल्याचे कुणाल यावेळी म्हणाला.
कामराच्या शोमध्ये काय झाले
कामराच्या शो दरम्यान एक गाणे गायले गेले. त्या गाण्याचे बोल असे होते की ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा,
हाय.., एक झलक दिखलाए, कभी गुवाहाटी में छुप जाए. मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर को आएइसी को लेकर अब शिवसेना आक्रमक झाली
आणि कामरा याच्या शो नंतर एकना शिंदे यांचे शिवसैनिक मुलजी काका पटेल यांच्या नेतृत्वाखाली अंधेरी एमआयडीसीतील
युनी कॉन्टीनेन्ट हॉटेलात रात्री साडे अकरा वाजता पोहचले आणि स्टूडियोची तोडफोड केली.
आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अभिनेत्री कंगणा रणौतने टीका केली होती.
त्यावेळी पालिकेने तिच्या घराचे काम तोडले होते.
आता तशाच प्रकारे अंधेरीतील या हॉटेलचे बांधकाम पालिकेने तोडले आहे.