रोटरी क्लब ऑफ अकोट तर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर

रोटरी क्लब ऑफ अकोटतर्फे भव्य नेत्र तपासणी

अकोट -अकोट शहरातील इफ्तेखार प्लॉट येथे रोटरी क्लब ऑफ अकोट तर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर संपन्न झाले. या शिबिरात

परिसरातील तब्बल ६४० नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.तपासणीदरम्यान ४५५ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. रोटरी क्लबचा

हा उपक्रम पाहून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच आभारही व्यक्त केले.शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर इखार यांनी रुग्णांची तपासणी केली. या

प्रकल्पाचे प्रमुख रोटे इंजी. प्रमोद लहाने यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.रोटरी क्लब ऑफ अकोटचे अध्यक्ष रोटे इंजी. रवि पवार यांनी

सांगितले की, भविष्यात देखील अशा प्रकारचे शिबिरे राबवून नेत्र तपासणी आणि उपचाराचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल.शिबिराच्या

यशस्वीतेसाठी रोटे शिरीष पोटे, राजकुमार गांधी, संतोष इस्तापे, दीपक कतोरे, श्याम शर्मा, उद्धव गणगणे, विठ्ठलराव डोबाळे, परिक्षीत बोचे तसेच सेवाभावी

कार्यकर्ते सैय्यद तनवीर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

Read also :https://ajinkyabharat.com/puranpoi-naivedya-and-sadi-choi-arpan-karoon-danpur-yehet-nadipujan/