युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे.
हरियाणा पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्याकडून तीन मोबाईल फोन आणि
एक लॅपटॉप जप्त केला होता. हे सर्व डिजिटल फॉरेन्सिक तपासणीसाठी मधुबन,
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
करनाल येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. आता मोबाईलमधील
डिलिट केलेला डाटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आलं असून,
यातून मिळालेल्या माहितीमुळे ज्योतीसाठी अडचणी वाढल्या आहेत.
पाकिस्तानशी थेट संपर्काचे पुरावे या डाटामधून समोर आले आहेत.
आयएसआयशी संबंधित Pakistan Intelligence Operative (PIO) आणि
दानिश नावाच्या पाकिस्तानच्या दूतावासातील अधिकाऱ्याशी झालेला संवाद याचे पुरावे
पोलिसांच्या हाती लागले आहेत. व्हॉट्सॲप चॅट्स, व्हिडीओ ट्रान्सफर आणि कॉल डिटेल्स
यामधून ती हेरगिरीच्या कामात गुंतलेली होती, असे स्पष्ट होत आहे.
लॅपटॉपचा तपशील अद्याप येणे बाकी असतानाच, मोबाईल डाटामधून मिळालेले पुरावे या
प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यास मदत करणार असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
देशभरातील अनेक पोलिस यंत्रणा – राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश –
यांच्याकडूनही सखोल चौकशी सुरू आहे. ज्योतीने युट्यूबसाठी केवळ प्रवास केले नसून,
भारताच्या संवेदनशील माहितीची देवाणघेवाण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कोर्टाने २२ मे रोजी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, नंतर ती चार दिवसांनी वाढवण्यात आली.
या रिमांडमध्ये गहन चौकशीत अनेक रहस्ये उलगडली आहेत.
आता पुन्हा रिमांड मागण्यात येणार का, की न्यायालयीन कोठडी दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विदेश दौरे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार
ज्योतीने पाकिस्तान, दुबई, थायलंड आणि चीन या देशांचे दौरे केले होते.
एका सामान्य युट्यूबरकडे एवढा पैसा कुठून आला? या प्रश्नाच्या उत्तरासाठी पोलिसांनी
तिच्या वडिलांच्या बँक खात्यांची तपासणी सुरू केली आहे.
आतापर्यंत संशयास्पद व्यवहार आढळले असून, बँकेकडून अधिकृत रिपोर्ट मागवण्यात आला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolichaya-krishi-bhan-baza/