दि. तेल्हारा
तेल्हारा येथे युवासेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
स्पर्धा परीक्षा करियर मार्गदर्शन ,सुद्धा आयोजित केले होते यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय बाळासाहेब
Related News
ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .
याकार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख , माजी आमदार संजय गावंडे ,
शिवसेना जिल्हा प्रमुख मंगेश काळे , शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे , युवासेना प्रा दीपकजी बोचरे ,
विधानसभा समन्वयक प्रदीप सोनटक्के , विधानसभा सह समन्वयक गजानन मोरखडे , शिवसेना तालुका प्रमुख अजय गावंडे ,
शिवसेना शहर प्रमुख विवेक खारोडे , युवासेना शहर प्रमुख गौरव धुळे ,शेतकरी सेने उपजिल्हा प्रमुख गोपाल विखे ,
माजी शहर प्रमुख राजेश वानखडे , माजी तालुका प्रमुख युवासेना निलेश धनभर , सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ फाटकर ,
महिला आघाडी सौ वनिता वाकोडे ,महिला आघाडी शहर प्रमुख इंगोले ताई , गिरीश कोरपे सर , ताकोते सर ,
सोळंके सर ,राहुल शृंगारकर सर, प्रा सचिन गव्हाळे सर , मानकर सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रम पार पडला .
युवासेना पदाधिकारी याच्या वतीने शिवसेना उपनेते नितीन बाप्पु देशमुख यांचा जाहीर सत्कार करण्यात आला .
यावेळी दहावी यामध्ये ८०% वर मार्क मिळवलेल्या गुणवंत विद्यर्थ्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला .
तेल्हारा शहरातील भाविक धर्मेश चौधरी हा विद्यार्थी गंभीर आजाराने पीडित असून सोबतच मोठ्या शारीरिक सर्जरी होऊन सुद्धा जिद्द
व चिकाटी मुळे त्याने दहावीत घवघवीत यश संपादन केले त्या बद्द्ल विशेष सत्कार आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला .
युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा सचिन थाटे यांनी शिवसेना नेते नितीन बाप्पु देशमुख यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून मरणोत्तर
अवयव दान संकल्प केल्या बद्दल त्याचा जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
या कार्यक्रमाच्या निमित्याने आमदार नितीन बाप्पू देशमुख यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
आई वडिलांच्या कठीण परिश्रमाची जाणीव ठेऊन आयुष्यात कठीण परिश्रम करून यश संपादन करा असे आवाहन त्यांनी केले .
सोबतच माजी आमदार संजय गावंडे , शिवसेना जिल्हा प्रमुख मंगेश काळे ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे ,
युवासेना सचिव प्रा दीपक बोचरे यांनी सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
तेल्हारा तालुक्यातील स्पर्धा परीक्षा माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यर्थ्याचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी अमित घोडेस्वार ,
गौतम दामोदर,मनीष गवळी ,निलेश धनभर , रहेमान शाह, उद्धव पाथ्रीकर , वैभव गावंडे , बंटी राऊत , अतुल कुकडे, किशोर डामरे ,
आदित्य उमाळे , रोहित अग्रवाल सुरज काइंगे राजेश नेमाडे यांच्या सह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग व पत्रकार बांधव उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा सचिन थाटे तर आभार प्रदर्शन राजेश वानखडे यांनी केले .
Read Also : https://ajinkyabharat.com/pop-ganeshmurti-visarjanasathi-fadnavis-sarkar-nave-dhorana-mole/