मानोरा – सहा महिन्यांपासून थकलेले मानधन मिळाले नसल्याने
मानोरा तालुक्यातील युवा प्रशिक्षणार्थी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या शिक्षकांनी आज (दि. २६) गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर
धडक देत थकित मानधन तातडीने अदा करण्याची मागणी करत निवेदन सादर केले.
मानधन न मिळाल्याने शिक्षकांपुढे उदरनिर्वाह, घरभाडे, कर्जाचे हप्ते,
मुलांचे शैक्षणिक खर्च, प्रवासखर्च आदींमध्ये गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने शिक्षक गटशिक्षणाधिकारी
अनिल पवार यांच्या दालनात दाखल झाले.
शांततेच्या मार्गाने त्यांनी आपली व्यथा मांडत निवेदन दिले.
या वेळी वाशिम जिल्हा अध्यक्ष नितीन चगदळ, तालुका अध्यक्ष धिरज ठाकरे,
उपाध्यक्ष जयंत कडबे, सहसचिव संतोष थोरवे, सचिव अमोल साबळे
यांच्यासह वैभव नवरे, सुधीर इंगळे, संदिप कडबे, आकाश काटकर, हुजेफ खान,
कांचन पवार, दीपाली गावंडे, मेघा मेघे, रुपाली अस्वार, तेजस्विनी गावंडे,
जनाबाई बोंबले, प्रांजली इंगोले, आरती राऊत, सचिन ठाकरे, नंदकिशोर नेमाने,
अनिकेत झलके आदी उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांनी शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले.
त्यांनी सांगितले, “स्वातंत्र्य तांत्रिक सहाय्यक नसल्यामुळे कार्यभार तांत्रिक सहाय्यकांकडे होता.
त्यामुळे मानधन वितरणास विलंब झाला.
मात्र संबंधित विभाग प्रमुखांची चौकशी करून रखडलेले
मानधन तातडीने अदा करण्याबाबत शासन स्तरावरून सूचना निर्गमित करू,” असे आश्वासन दिले.
Read also :https://ajinkyabharat.com/mumbaiat-maratha-morchamuye-prachanda-gardi/