कोलकात्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. सरकारी रुग्णालयातील
निवासी डॉक्टरची बलात्कार करुन हत्या केल्याची संतापजनक घटना कोलकात्यात घडली.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर आज,
मंगळवारपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचं
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स संघटनेनं निवेदनाद्वारे कळवलं आहे.
तसेच, या काळात अत्यावश्यक सेवा सुरूच असतील असंही मार्डच्या वतीनं
सांगण्यात आलं आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर
विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन नं मंगळवार,
13 ऑगस्टपासून देशव्यापी निषेध दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी ओपीडी आणि वैकल्पिक सेवा बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि
हॉस्पिटलमध्ये एका महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन
तिची हत्या करण्यात आली. याच निषेधार्थ आज देशभरातील डॉक्टरांनी बंद पुकारला आहे.
फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील
निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेसुद्धा सर्व निवासी डॉक्टरांना निवडक सेवा
बंद करण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील
निवासी डॉक्टर संघटनेनं आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी
संलग्न रुग्णालयांत काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनी त्यांचा निर्णय जाहीर केला.
हे काम बंद आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत असून अनिश्चित कालावधीसाठी
असल्याचं सांगण्यात येत आहे. वैद्यकीय वर्तुळात कोलकाता येथील घटनेचा
तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/845-people-died-in-kerala-in-last-8-years/